Chhattisgarh News  Saam Tv
देश विदेश

माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या, मध्यरात्री घरात घुसले अन्...

BJP Leader Killed By Maoists: छत्तीसडमध्ये माओवाद्यांनी भाजप नेत्याची गळा आवळून हत्या केली. छत्तीसडच्या बिजापूरमध्ये ही घटना घडली. माओवाद्यांनी मृतदेहाजवळ एक पत्रक ठेवत त्यामध्ये हत्येमागचं कारण सांगितलं.

Priya More

Summary -

  • माओवाद्यांनी भाजप नेते सत्यम पुनेम यांची हत्या केली

  • छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात ही घटना घडली

  • माओवाद्यांनी मध्यरात्री त्यांची गळा आवळून हत्या केली

  • हत्येनंतर मृतदेहाजवळ पत्रक ठेवत हत्येमागचं कारण सांगितलं

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये माओवाद्यांनी भाजप नेत्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माओवाद्यांनी भाजप नेत्याची गळा आवळून हत्या केली. बीजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकमधील मुंजाल कांकेर येथे ही घटना घडली. भाजप नेता सत्यम पुनेमची मध्य रात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. भाजप नेत्याच्या मृतदेहाजवळ माओवादी एक पत्रक ठेवून गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यम पुनेम हे खबरी असल्याचा संशय माओवाद्यांना होता. ते गावात होत असलेल्या कारवायांची माहिती पोलिसांना पुरवत होते असं देखील माओवाद्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी भाजप नेत्याला संपवलं. या घटनेनंतर मद्देड एरिया कमिटीने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजप नेत्याच्या हत्येचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माओवाद्यांनी भाजप नेत्याच्या मृतदेहाजवळ ठेवलेल्या पत्रकात असं लिहिले आहे की, वारंवार इशारा देऊनही सुधारणा न केल्यामुळे माओवाद्यांनी भाजप नेत्याला मृत्यूची शिक्षा दिली. या मृत्यूची जबाबदारी आमच्या क्षेत्र समितीची नाही तर ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी-फॅसिस्ट भाजप विष्णुदेव साई सरकारची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT