BJP  Saam tv
देश विदेश

भाजप नेत्याच्या मुलीचा भरदिवसा विनयभंग; दुचाकीस्वाराने कानशि‍लात लगावली, घटना CCTVत कैद

uttar pradesh crime : भाजप नेत्याच्या मुलीचा भरदिवसा विनयभंग झाल्याची घटना घडली. दुचाकीस्वाराने भाजप नेत्याच्या मुलीला कानशिलात लगावल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

भाजप नेत्याच्या मुलीचा दिवसाढवळ्या विनयभंग

तिघा दुचाकीस्वारांनी मुलीची छेड काढताना सीसीटीव्हीमध्ये कैद

पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक, तिसरा फरार

मुलीच्या कुटुंबीय भयभीत, केली कडक कारवाईची मागणी

विनयभंगाच्या घटनेमुळे महिला सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्याच्या सिकंदाराराऊ गावातील घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या गावात कोचिंग क्लासवरून घरी परतताना दुचीकीस्वार तिघांनी भाजप नेत्याच्या मुलीची दिवसाढवळ्या छेड काढल्याची घटना घडली. मुलीची तिघांनी छेड काढल्यानंतर स्थानिक भाजप नेत्याने पोलिस स्टेशनला तक्रार करत एकच संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मैत्रिणींसोबत कोचिंग क्लासवरून घरी परतत होती. त्यावेळी रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी भाजप नेत्याच्या तरुणीची छेड काढली. छेड काढल्यानंतर या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला.

तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तक्रार नोंदवून कारवाईला देखील सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या कारवाईत दोघांना अटक केली आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी सांगितलं की, ही घटना गंभीर असून सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपींची ओळख पटवण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणांना कोर्टात सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात कडक कारवाई करण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून दोघांना अटक

पीडित तरुणीच्या वडिलांनी म्हटलं की, मुलीचा विनयभंग झाल्यामुळे कुटुंब घाबरलं आहे. माझी मुलगी मानसिक तणावात गेली आहे. कुटुंबीयांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT