BJP Leader Anuj Chaudhary killed in Uttar Pradesh  SAAM TV
देश विदेश

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशात भाजप नेत्याची घराबाहेरच निर्घृण हत्या; व्हिडिओ व्हायरल

BJP Leader killed in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

साम ब्युरो

BJP Leader killed in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मुरादाबादच्या मझोला परिसरात दिल्ली रोडस्थित पार्श्वनाथ हाउसिंग सोसायटी परिसरात ही घटना घडली. मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी भाजप नेते अनुज चौधरी यांच्यावर बेधुंद गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. जखमी चौधरींना त्यांचे नातेवाइक आणि शेजाऱ्यांनी नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

अनुज चौधरी हे भाजप किसान मोर्चाशी संबंधित होते. भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्र्यांचे नीकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या हत्येनंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षक हेमराज मीणा यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहणी केली. चौधरींचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. (Crime News)

अनुज चौधरींनी २०२१ मध्ये असमोली ब्लॉक प्रमुखपदासाठी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. अनुज चौधरींनी विद्यमान ब्लॉक प्रमुखांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. चौधरी यांची भाजपचे राज्यातील नेते आणि मंत्र्यांशी खूप जवळीक होती. भाजपचे दिग्गज नेते स्वतंत्र देव सिंह यांचे नीकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

चौधरी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षाही पुरवण्यात आली होती. २४ तास त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असायचे.

नेमकं काय घडलं?

मुरादाबादच्या मझोला परिसरातील पार्श्वनाथ हाउसिंग सोसायटीच्या परिसरात अनुज चौधरी हे बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर बेधुंद गोळीबार केला. यात ते जखमी झाले होते.

चौधरी यांच्या कुटुंबीयांनी मझोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक हेमराज मीणा यांनी सांगितले की, मझोला परिसरात एक घटना घडली आहे. अनुज चौधरी यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सोसायटीच्या बाहेरच्या परिसरात गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या चौधरींना नजीकच्या रुग्णालयात नेले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची माहिती घेतली जात आहे. कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. त्यात दोन व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत. संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT