Cow Attack On School Girl Viral Video: रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा मोकाट कुत्र्यांनी, प्राण्यांनी हल्ला केल्याच्याही घडल्या आहेत. असाच काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार चेन्नईमध्ये घडला आहे. शाळकरी मुलीवर भटक्या गाईने हल्ला केल्याची घटना चेन्नईमध्ये घडली असून, या हल्ल्याचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहताना अंगावर काटा उभा राहतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका शाळकरी चिमुकलीवर भटक्या गाईने हल्ला केल्याचे दिसत आहे.
गाईने केलेल्या या भयंकर हल्ल्यात ९ वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. हल्ल्यावेळी मुलीची आई तिला वाचवण्याचा प्रयत्न करते, मात्र गाई कोणालाच जवळ येवू देत नव्हती.. ही संपूर्ण घटना सिसीटीव्ही (CCTV Camera) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, मुलगी आपल्या आईसोबत शाळेतून घरी येत आहे. अचानक गल्लीतील गाई तिच्यावर हल्ला चढवते. अचानक झालेल्या हल्ल्याने मुलीची आई घाबरून जाऊन आरडा- ओरडा करते, मात्र गाई कोणालाच जवळ येवू देत नाही. गाईचा हल्ला इतका भयंकर आहे की मुलीला थेट शिंगावर उचलून फेकते.
गल्लीत असलेले अनेक जण या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र खवळलेली गाई चिमुकलीला अक्षरशः तुडवून तुडवून हल्ला करताना दिसत आहे. लोकांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर गाई मुलीला सोडते. ज्यानंतर सर्वजण मुलीला उचलून घेवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात.
दरम्यान, सध्या ही मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या भयानक घटनेने परिसरातील नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले असून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच हल्ला करणाऱ्या गाईला पकडले असून गाईच्या मालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा भयंकर व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.