SUSPICIOUS DEATH OF BJP LEADER IN DHANBAD | FAMILY ALLEGES MURDER Saam Tv
देश विदेश

भाजप नेत्याचा घरात आढळला मृतदेह, दोन पत्नींवर कुटुंबाचा संशय; नेमकं काय प्रकरण?

Jharkhand BJP Leader Death News : धनबादमध्ये भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष अमृत दास यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी दोन पत्नींवर खुनाचा आरोप केला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अमृत दास यांचा मृतदेह घरात संशयास्पद अवस्थेत आढळला

  • दोन पत्नींमधील वादामुळे घटना घडल्याचा संशय

  • कुटुंबीयांनी खुनाचा गंभीर आरोप केला

  • पोलीस तपास सुरू, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

धनबाद जिल्ह्यातील गोविंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजपच्या एससी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अमृत दास यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.धक्कादायक म्हणजे अमृत दास यांनी दोन बहिणींशी लग्न केले होते, या बहिणींनी मिळून त्यांचा काटा काढल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत पोलिसांकडे न्यायाची मागणी केली असून, प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृत दास यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच गोविंदपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, घटनेच्या एक दिवस आधी अमृत दास हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत बाजारात गेले होते. यावरून घरात वाद निर्माण झाला होता. या कौटुंबिक वादातूनच ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, नेमके काय घडले याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, गोविंदपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी विष्णू राऊत यांनी सांगितले की, मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमांचे स्पष्ट चिन्ह आढळलेले नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मृताच्या आईने गंभीर आरोप करत सांगितले की, अमृत दास यांचे दोन बहिणींशी विवाह झाले होते आणि त्यांच्यात नेहमी वाद होत होते. आई आणि बहिणीने दोन्ही पत्नींवर मारहाण आणि हत्येचा आरोप केला आहे. मयताच्या बहिणीने भावाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत सांगितले की, "माझा एकच भाऊ होता. सवतींनी भांडणातून त्यांनी त्याला मारहाण केली आणि ठार मारले." सध्या पोलीस तपास करत असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT