BJP  saam tv
देश विदेश

Jharkhand BJP Candidate List : मोठी बातमी! झारखंड विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, कुणाला कुठून मिळाली संधी?

Jharkhand Political News : झारखंड विधानसभेसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ६६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Vishal Gangurde

झारखंड : झारखंड विधासनभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. झारखंडमध्ये शुक्रवारी भाजप आणि आजसून जागावाटचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानंतर आज शनिवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या यादीत थेट ६६ उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत भाजपने दिग्गज नेत्यांना संधी दिली आहे. भाजपने पहिल्या यादीत चंपाई सोरेन यांना सरायकेलामधून उमेदवारी दिली आहे. तर बाबुलाल मरांडी यांना धनवारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

भाजपने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करताच तेथील राजकारण तापलं आहे. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर या निवणडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४३ जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर मतदान होणार आहे.

भाजपतर्फे राजमहलमधून अनंत ओझा, बोरियोमधून लोबिन हेम्ब्रम, लिटिपाडाहून बाबूधन मुर्मू, महेशपूरहून नवनीत हेम्ब्रम, शिकारीपाडाहून परितोष सोरेन, नालाहून माधव चंद्र महतो, दुमकाहून सुनील सोरेन, जामाहून सुरेश मुर्मू, जारमुंडीहून देंवेद्र कुंवर, मधुपूरहून नारायण सिंग, सारठहून रणधीर कुमार, देवघरहून नारायण दास, पोडैयाहाटहून देवेंद्र सिंह, गोड्डाहून अमित कुमार मंडल यांना तिकीट देण्यात आलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, झारखंडमध्ये एकूण २,५५,१८,६४२ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार १,२९,९७,३२५ आहेत. तसेच १,२५,२०,९१० इतक्या महिला मतदार आहेत. या झारखंड विधानसभा निवडणुकीत ४२ हा आकडा मॅजिक फिगर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सामान्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! चांदीने ४ लाखांचा टप्पा ओलांडला, सोनेही १६ हजारांनी वाढले, आता काय करायचे; जाणून घ्या?

KDMC News : ठाकरेंचे ते ४ नगरसेवक गेले कुठे? निवडणूक निकालानंतरही बेपत्ता, सस्पेन्स वाढला

Skin Care Routine: मॉइश्चरायझर, सीरम की सनस्क्रीन...; डेली स्किन केअर रुटीन नक्की कशी करायची?

Coconut Ice Cream Recipe : महागडे कोकोनट आईस्क्रीम घरच्या घरी बनवा, फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकी कारणं येणार समोर, ब्लॅक बॉक्स सापडला

SCROLL FOR NEXT