Bjp is winning four states in assembly elections aap also hav a big sucess in punjab Saam TV
देश विदेश

Assembly Election Results: पाच पैकी चार राज्यांत पुन्हा भाजप; कॉंग्रेसचा सुपडा साफ, तर 'आप'ला मोठं यश...

Assembly Election 2022 Results Live: पंजाबकडून कॉंग्रेसला मोठी आशा होती, परंतू तिकडे आम आदमी पक्षाने कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: देशाच्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे (Assmebly Elections 2022) कल हाती येतायात. देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत निवडणुका झाल्या असून आता त्यांचे कल हाती येतायत. या कलांनुसार पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे तर कॉंग्रेसची (Congress) पाचही राज्यात सत्ता येण्याची आशा मावळली आहे. पंजाबकडून कॉंग्रेसला मोठी आशा होती, परंतू तिकडे आम आदमी पक्षाने (Aam Admi Party) कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. (Bjp is winning four states in assembly elections aap also hav a big sucess in punjab)

हे देखील पहा -

कोणत्या राज्यात कोण आघाडीवर?

उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेश राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करेल असं दिसतंय. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकुण ४०३ जागा आहे. त्यापैकी भाजप २५५ तर सपा ९९ जागांवर आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस ४, बसपा ४ आणि इतर जागांवर आघाडीवर आहे.

पंजाब -

पंजाब राज्यात आम आदमी पक्षाने सत्ताधारी कॉंग्रेसला मोठा धक्का दिलाय. पंजाब राज्यात विधानसभेचे ११७ सीट्स आहेत. यापैकी आम आदमी पक्ष हा ८८ जागांवर आघाडीवर आहे. कॉंग्रेस केवळ ११, अकाली दल ११, भाजप ६ जागांवर आघाडीवर आहे.

उत्तराखंड -

उत्तराखंड राज्यातही भाजप आघाडीवर आहे. उत्तराखंड राज्यात विधानसभेच्या ७० जागा आहेत. यापैकी भाजप ४१ जागांवर आघाडीवर आहे, तर कॉंग्रेस २५ जागांवर आघाडीवर आहे. इतर पाच जागांवर आघाडीवर आहे.

गोवा -

गोवा राज्यातही भापजला सत्ता राखण्यात यश येईल असं दिसतयं. गोवा राज्यात विधानसभेच्या ४० जागा आहेत. यापैकी भाजप जागांवर १८ आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस १४ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष हा ५ जागांवर आघाडीवर असून गोव्यातही पुन्हा भाजप सरकार येण्याचं चित्र आहे.

मणिपूर -

मणिपूर राज्यातही भाजप आघाडीवर आहे. मणिपूर राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. यापैकी भाजप २७, कॉ्ंग्रेस १०, एनपीएफ ६, एनपीपी ११ जागांवर आघाडीवर आहे.

एकूणच पाहता या पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपची सत्ता येणार हे चित्र जवळपास स्पष्ट आहे. कॉंग्रेसला यात मोठं अपयश मिळालं आहे तर आपला मोठं यश मिळालं आहे. पंजाबच्या निमित्तानं आपची राष्ट्रीय राजकारणात खऱ्या अर्थानाे एन्ट्री झालीय, तर कॉंग्रेस केवळ दोन राज्यांत उरली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT