Live In Relationship
Live In Relationship Saam Digital
देश विदेश

Live In Relationship: लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे भयंकर आजार, भाजपच्या खासदाराचं संसदेत वक्तव्य

Sandeep Gawade

BJP MP Comment On Live In Relationship

हरियाणातील महेंद्रगढचे भाजप खासदार धर्मबीर सिंह यांनी संसदेत लिव्ह इन रिलेशनशीपवर भाष्य केलं आहे. लिव्ह इन रिलेशनशीप म्हणजे एक भयंकर आजार असल्याचं त्यांनी म्हटलं असून या वक्तव्यामुळे ते वादात सापडण्याची शक्यता आहे. हा एक भयंकर आजार असून त्याला समाजातून संपवून टाकलं पाहिजे. या आजाराविरोधात केंद्राने कायदा करण्याची गरज आहे. भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकम आणि बंधुत्वाच्या तत्वज्ञानासाठी ओळखली जाते. त्यामुळे अशा संबंधांसाठी मुला -मुलीच्या आई वडिलांची परवानगी अनिवार्य करावी, अशी मागणी त्यांनी लोकसभेत शून्य प्रहरावेळी केली आहे.

भारतातील विवाह संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले, प्रेम विवाहात घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. भारतीय संस्कृती जगातील इतर संस्कृतींपेक्षा वेगळी आहे. संपूर्ण जग भारताच्या विविधतेतील एकतेमुळे प्रभावित आहे. समाजातील एक मोठा वर्ग आजही पालक आणि नातेवाईकांच्या संमतीने ठरवलेल्या लग्नाला प्राधान्य देतो. यामध्ये वधू वरांची संमती असते. सामाजिक, वैयक्तिक मूल्ये तसेच कौटुंबिक पार्श्वभूमी यासारख्या सामान्य गोष्टी विवाहामध्ये विचारात घेतल्या जातात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्न एक पवित्र नाते मानले जाते ते सात पिढ्या टिकते. मात्र प्रेम विवाहामध्ये याचे प्रमाण मोठे आहे. भारतात घटस्फोटाचे प्रमाण १.१ टक्के आहेत तर तेच प्रमाण अमेरिकेत ४० टक्के आहे. पालकांच्या संमतीने केलेल्या लग्नामध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूपच कमी आहे. मात्र अलिकडे वाढलेल्या प्रेम विवाहामुळे यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने प्रेमविवाहासाठी पालकांची संमती अनिवार्य करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण अडचणींच्या सापळ्यात; सर्व्हर डाऊनमुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड

Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

SCROLL FOR NEXT