Maharashtra Politics  Saam tv
देश विदेश

Maharashtra Politics : मोठी बातमी! भाजपचा गटनेता ठरवणारे निरीक्षक ठरले, कोणाची केली नेमणूक? वाचा

Maharashtra Political News : भारतीय जनता पक्षाच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. भाजपने नेमणूक केलेले वरिष्ठ नेते गटनेता ठरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Subhash Jagtap

मुंबई : भाजपच्या गटातून मोठी बातमी हाती आली आहे. राज्यात सत्तास्थापनेमुळे महायुतीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. सत्ता स्थापनेआधी महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गटाने त्यांच्या विधीमंडळाच्या नेत्यांनी निवड केली आहे. त्यानंतर आता भाजपच्या विधीमंडळ नेत्याची उद्या मंगळवारी पक्षाच्या निरीक्षकाकडून निवड केली जाणार आहे. यासाठी भाजपने निरीक्षकांची निवड केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळ नेत्याची नेमणूक करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपने निरीक्षक म्हणून विजय रुपाणी, निर्मला सीतारमण यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकाकडून उद्या म्हणजे मंगळवारी विधीमंडळ नेते, प्रतोद, गटनेत्याची निवड केली जाणार आहे.

या दोन्ही निरीक्षकांच्या नेमणुकीनंतर सत्तास्थापनेचा मार्ग आणखी सुकर होणार आहे. विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे दोन्ही केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात येऊन जबाबदारी घेणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नेमणूक केलेले निरीक्षक मंगळवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत येणार आहे. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी भाजप विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गटनेता निवडला जाणार आहे.

दरम्यान, भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी म्हटलं की, 'पक्षाच्या संसदीय बोर्डाने महाराष्ट्रातील भाजपचे विधीमंडळ नेते निवडण्यासाठी विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

मुख्यमंत्री कोण होणार?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथविधी झाला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसंदर्भातील भाजपच्या निर्णयाला पाठिंबा असेल. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे की, राज्याचा पुढील मुख्यमंत्री हा भाजपचा असेल. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Accident: कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूला कंटेनरला धडकली, २ जणांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

Bollywood Actress: ग्रे गर्ल्स...; बॉलिवूड अभिनेत्रींचा ग्लॅमरस ग्रे लेहंगा आउटफिट लूक, पाहा फोटो

Maharashtra Live News Update: हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Shraddha Kapoor Photos : चुराके दिल मेरा गोरिया चली, श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य

मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंच्या कारवर भीषण हल्ला, ओबीसी मेळाव्याला जात असताना काचा फोडल्या

SCROLL FOR NEXT