PM Modi, Amit Shah, J. P. Nadda SAAM TV
देश विदेश

Telangana Election: तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, केसीआर विरोधात कोण लढवणार निवडणूक?

Satish Kengar

Telangana BJP Candidates List:

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची (भाजप) पहिली यादी जाहीर झाली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल ज्यांचे निलंबन मागे घेण्यात आलेले आहे, त्या टी राजा सिंह यांना भाजपने गोशमहल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर संजय कुमार बंदी करीमनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

राजेंद्र एटाळा हे हुजुराबाद आणि गजवेल या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे (आता भारत राष्ट्र समिती) माजी सदस्य असलेले एटाला हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या विरोधात गजवेलमध्ये निवडणूक लढवणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी 52 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत तीन उमेदवार विद्यमान खासदार आहेत, ज्यात तेलंगणा पक्षाचे माजी अध्यक्ष संजय कुमार बंदी, बापूराव सोयाम आणि अरविंद धर्मपुरी यांचा समावेश आहे. सोयाम बोथमधून, तर धर्मपुरी कोरुटला मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. (Latest Marathi News)

भाजप अध्यक्ष प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी झालेल्या भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीत नावे निश्चित करण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.

काँग्रेसनेही जाहीर केली पहिली यादी

याआधी काँग्रेसने तेलंगणा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर रोजी 55 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये पक्षाचे राज्य युनिट प्रमुख अनुमुला रेवंत रेड्डी कोडंगलमधून आणि तेलंगणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांना हुजूरनगरमधून उतरवले होते.

दरम्यान, तेलंगणा विधानसभेची निवडणूक 30 नोव्हेंबरला होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील एकूण 35,356 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यात शहरी भागातील 14,464 मतदान केंद्रे आणि ग्रामीण भागातील 20,892 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT