Bihar Election  Saam tv
देश विदेश

Bihar Election : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची मोठी कारवाई; आमदाराची थेट पक्षातून हकालपट्टी

Bihar Election Update : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने आमदाराची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Vishal Gangurde

भाजप आमदार पवन यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी.

यादव यांनी एनडीएच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात केली होती बंडखोरी

भाजप प्रदेशाध्यक्ष अरविंद शर्मा यांनी जारी केलं कारवाईचं पत्र

बिहारच्या भागलपूरमधील कहलगाव विधानसभा मतदारसंघात आमदार पवन यादव यांना बंडखोरी करणं महागात पडलं आहे. बंडखोरी केल्याने भाजपने पवन यादव यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. कहलगांवात जनता दल युनायटेडचे उमेदवाराच्या विरोधात पवन यादव उभे राहिले आहेत. यामुळे भाजपने पवन यादव यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी पत्र जारी केलं. आमदार पवन यादव हे एनडीएच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहिले. अरविंद शर्मा यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं की, पवन सिंह यांच्या कृतीने पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. आमदार पवन यांच्या भूमिकेने पक्षाच्या धोरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष कुमार साह यांनी पवन यादव यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. त्यांनी म्हटलं की, 'त्यांनी पक्षविरोधी कार्य केलं आहे. त्यांची भूमिका भाजप पक्ष सहन करणार नाही. व्यक्ती हा पक्षापेक्षा मोठा नाही. पक्षाने कारवाई करून चांगला संदेश दिला आहे. कहलगांव विधानसभा मतदारसंघात एनडीएच्या जनता दल युनायटेडचे उमेदवार शुभानंद मुकेश यांच्या विरोधात ते निवडणूक लढत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: खर्च वाढेल, अपूर्ण कामं पू्र्ण होतील; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महायुद्धाचा फटका द्राक्ष निर्यातीला; जीएनपाटी बंदरावर २५० कंटेनर अडकले, शेतकऱ्यांना ५० टक्के तोट्याची

Accident: शिमगोत्सवादरम्यान भयंकर घडलं! कारखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू, अपघातावेळी खिडकीतून खाली पडला नंतर...

BMC: मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य; संजय राऊत-राज ठाकरे यांची 25 मिनिटे चर्चा; बैठकीत काय- काय ठरलं?

Chhatrapati Shivaji Maharaj fort: समुद्रासमोर सिंधुदुर्ग किल्ला ताठ उभा राहण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणती युगत मांडली?

SCROLL FOR NEXT