भाजपचे माजी आमदार ठुकराल काँग्रेसमध्ये दाखल
नारायण पाल यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला
निवडणुकीपूर्वी राजकीय उलथापालथ
काँग्रेसची ताकद वाढल्याची चर्चा
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी आमदार राजकुमार ठुकराल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून बसपाचे माजी आमदार नारायण पाल यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसची ताकद वाढत असल्याची चर्चा आहे.
राजकुमार ठुकराल यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या रंगत होत्या. अखेर उत्तरखंडच्या प्रभारी कुमारी शैलजा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा प्रवेश झाला. ठुकराल यांच्यासोबत भाजपचे माजी आमदार भीमलाल आर्य, माजी महापौर गौरव गौयल, लखन सिंह यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ठुकराल हे एकेकाळी ते भाजपचे एक खंदे नेते मानले जात होते. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
यानंतर भाजपने ठुकराल यांना पक्षातून काढून टाकले. इतकेच नाही, तर ठुकराल आता पक्षासाठी प्राधान्यक्रमावर नाहीत, हे भाजपने आधीच स्पष्ट केले होते. २०२२ च्या निवडणुकीत भाजपने ठुकराल यांना रुद्रपूर मतदारसंघातून तिकीट नाकारून शिव अरोरा यांना उमेदवारी दिली आणि पक्षाने त्यांच्यापासून स्वतःला दूर केले आहे, हे स्पष्ट केले.
राजकुमार ठुकराल यांच्याप्रमाणे नारायण पाल यांनी देखील पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाल हे आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर बहुजन समाज पक्षात (बीएसपी) सामील झाले आणि आता काँग्रेस पक्षात परतले आहेत. दरम्यान काँग्रेसमध्ये होत असलेल्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस मजबुत स्थितीत येत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.