देश विदेश

शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत

भाजपचे शिष्टमंडळही सोमय्यांसह दिल्लीत

वृत्तसंस्था

दिल्ली: राज्यामध्ये सुरु असलेला भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष आता दिल्लीत पोहोचला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांवर शनिवारी रात्री शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहे. सकाळी सव्वा दहा वाजता हे शिष्टमंडळ भल्ला यांची भेट घेणार आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट मिळणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील पाहा-

या शिष्टमंडळात सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह, भाजपा महापालिका नेते विनोद मिश्रा यांचा समावेश आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट (Tweet) करून सांगितले आहे की, भाजपचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग सुरु केला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्यांवर पोलिस (Police) स्टेशनच्या आवारात हल्ला केला जात आहे. या सर्वांची चौकशी केली जावी अशी आमची मुख्य मागणी आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी काल आरोप करत असताना सांगितले होते की, खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला आहे. तो हल्ला ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आणि पोलीस स्थानकाचे दार उघडताच, बाहेर असलेल्या ७०-८० गुंडांच्या माझ्या गाड्यांना हवाली करण्याचे पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केले असल्याचा आरोप सोमय्यांनी यावेळी केला होता.

एवढेच नाहीतर किरीट सोमय्याचा मनसुख हिरेन करायचा असे नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केले असल्याचा खळबळजनक दावा देखील किरीट सोमय्यांनी केला होता. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने संजय पांडेंनी घडवून आणला आहे. काल सकाळी केंद्राचे कॅबिनेट सचिव राजीवकुमार गौबा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना याविषयी चौकशी करायला सांगितले आहे,असेही किरीट सोमय्यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT