BJP and Congress workers clash violently outside Congress office in Patna, with stone pelting and lathi attacks leaving several injured. saam tv
देश विदेश

काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये थेट लाठ्याकाठ्यांनी हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली

BJP vs Congress Violent Clash In Patna Bihar: पाटणा येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दगडफेक आणि लाठीमारात अनेक जखमी झाले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. राहुल गांधींच्या आंदोलनानंतर देशभरात तणाव वाढला आहे.

Omkar Sonawane

बिहारची राजधानी पाटणा येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटत असताना याच पार्श्वभूमीवर पाटणाच्या काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घालण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्याठिकाणी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. पाहता पाहता हा वाद इतका टोकाला गेला की दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि लाठीमार सुरू झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांची डोकी देखील फोडली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव देखील डोक्यातून सुरू होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अधिकचा फौजफाटा त्याठिकाणी बोलवत मोठा बंदोबस्त तैनात केला.

हे आंदोलन राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या विरोधात भाजपने जाहीर केलेल्या देशव्यापी आंदोलनाचा भाग होता. या लाठाकाठ्यांच्या मारहाणीच्या प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर NEET पेपरफुटी आणि तरूणांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या विरोधात ठिय्या मांडला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत दोनतीन तासांनी त्यांची सुटका केली होती.

या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेस विरोधात देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. पाटणा येथील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय आणि आसपासच्या भागात पोलिसांचा फौजफाटा उभा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'महाराष्ट्राचा धुरंधर नेता'; CM साठी चक्क राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शहरभर बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात खळबळ

Thane Crime: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, भांडणानंतर राग डोक्यात गेला; हत्या करून तरुणाने पळ काढला

आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मगच चर्चा; काँग्रेस ठाम, थेट राज्यसभेत मागणी, VIDEO

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे उपरोधिक आंदोलन

Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

SCROLL FOR NEXT