CJP Protest: मनोज जरांगेंनी घेतली अभिजीत दिपकेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

Manoj Jarange Patil On CJP Protest: मनोज जरांगे पाटील दिल्लीत गेले आहेत. त्यांनी जंतर -मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला.
CJP Protest: मनोज जरांगेंनी घेतली अभिजीत दिपकेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली?
CJP ProtestSaam Tv
Published On
  • मनोज जरांगे पाटील दिल्लीत

  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे अभिजीत दिपके यांची भेट घेतली

  • सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला

  • आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज झाल्यास सरकारला इशारा दिला

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला वेगळं वळण आले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत अभिजीत दिपके आणि आंदोलकांची भेट घेतली. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील दिल्लीत दाखल झाले. जंतर-मंतरवर जाऊ त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

जंतर-मंतरवरून मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला थेट इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, शांततेच्या आंदोलनात ताकद आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. जागा फक्त सोडू नका त्यांना आपण निवडून दिलेले आहे. आपण आणि आपल्या मायबापांनी यांना मतदान केले. आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केले. आपल्या जिल्ह्यांनी तालुक्यांनी यांना मतदान केले आहे. पण आज हेच आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा- बाळांवरती उलटले आहेत. यांना उलटे करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आणि राज्यातील गोरगरीब जनतेमध्ये आहे हे यांच्या लक्षात नाही आहे.

CJP Protest: मनोज जरांगेंनी घेतली अभिजीत दिपकेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली?
Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

तसंच, 'जर या पुढच्या काळात तुम्हाला जर कुठे धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. सर्व देश, राज्य तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द मी देतो. पुन्हा जर लाठीचार्ज केला तर महाराष्ट्रात यांना फिरू देणार नाही.', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला दिला आहे. इथे जी पोरं बसले आहेत त्यांची तळमळ आहे. पण एखाद्या निर्णयामुळे त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत राहिले तर न्याय मिळतो. जंतर मंतरची जागा ही आंदोलनाची जागा आहे त्यामुळे इथे ते काही करू शकत नाहीत त्यामुळे आंदोलकांनी ही जागा सोडून नये.', असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केले.

CJP Protest: मनोज जरांगेंनी घेतली अभिजीत दिपकेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली?
Devisha Shetty: 'हिंसाचार म्हणजे लोकशाही नाही', सूर्यकुमार यादवच्या पत्नीची पोस्ट चर्चेत; CJP आंदोलनावर स्पष्ट केली भूमिका

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, शरद पवार, अमित ठाकरे यासह अनेक नेत्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली. या आंदोलनाला सरकार आणि पोलिसांकडून चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. सर्वांकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

CJP Protest: मनोज जरांगेंनी घेतली अभिजीत दिपकेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली?
CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com