राजस्थान: बारां नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर वार्ड क्रमांक 16 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येथील भाजपच्या उमेदवार अॅड अंतिमा यादव या मतदानानंतर पती आणि मुलासह अचानक बेपत्ता झाल्या आहेत. कुटुंबियांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भाजप उमेदवार अंतिमा यादव आणि त्यांचे पती संजय यादव हे दोघेही व्यवसायाने वकील आहेत. 9 सप्टेंबर रोजी नगर परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी आंबेडकर भवन येथील मतदान केंद्रावर जनसंपर्क केल्यानंतर घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने सोबत नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अंतिमा यादव, त्यांचे पती संजय यादव त्यांचा 7 ते 8 वर्षांचा मुलगा, या तिघांचेही मोबाइल मतदानानंतर सातत्याने बंद आहेत. त्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुटुंबीय राजेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्वतः मतदान केंद्रावर पोलिंग एजंट म्हणून तैनात होते. सायंकाळी सुमारे 5 वाजेपर्यंत अंतिमा यादव मतदान केंद्रावर दिसत होत्या. मात्र मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.
अंतिमा यादव यांचा पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही संपर्क तुटल्याने भाजपमध्ये चिंता वाढली आहे. भाजप नगराध्यक्ष ओपी पारेता यांनी सांगितले की, मतदानानंतर पक्षाकडून सर्व उमेदवारांकडून फीडबॅक घेतला जातो. गरज असल्यास उमेदवारांना पक्ष कार्यालयातही बोलावले जाते. मात्र मतदानानंतर अंतिमा यादव यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांच्या कुटुंबीयांकडूनही कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाकडूनही आपल्या पातळीवर त्यांचा शोध घेतला जात आहे. वार्ड क्रमांक 16 मध्ये भाजपची स्थिती मजबूत असून, पक्षाला विजयाची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.