Rajasthan New CM Saam Digital
देश विदेश

Rajasthan New CM: राजस्थानमध्येही भाजपचे धक्कातंत्र, भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Rajasthan New CM: राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून भजनलाल शर्मा यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. दिल्लीत भाजपची बैठक पार पडल्यानंतर शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Sandeep Gawade

Rajasthan New CM

राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून भजनलाल शर्मा यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. दिल्लीत भाजपची बैठक पार पडल्यानंतर शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा तिढा भाजपसमोर होता. या चर्चेत काही मोठी नावं होती मात्र छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशप्रमाणे नव्या चेहऱ्याला संधी देऊन भाजपने सर्वांना धक्का दिला आहे.

भाजप हायकमांडने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांची राजस्थानेच निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. आज दुपारी तिन्ही नेत्यांनी जयपूरमध्ये पोहोचून आमदारांची बैठक घेतली. दरम्यान भरतपूर येथील भजनलाल शर्मा बऱ्याच दिवसांपासून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सक्रीय होते. तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत होते. भाजपने त्यांना प्रथमच जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित मतदारसंघातून विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून निवडणूक लढवायला लावली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तिन राज्यात भाजपला बहुमत मिळाले मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स भाजपने कायम ठेवला होता. ३ डिसेंबरला निकाल लागला मात्र ९-१० दिवसांपर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांची घोषणा होत नव्हती. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोठ्या नावांची चर्चा होती. मात्र मध्य प्रदेश मोहन यादव आणि छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय या नव्या चेरऱ्यांची निवड करून धक्का दिला होता. राजस्थानमध्येही वसुंधराराजे, बाबा बालकनाथ आणि राजवर्धन राठोड मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मात्र शेवटच्याक्षणी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT