Madhya Pradesh New CM Mohan Yadav Saam Tv
देश विदेश

Madhya Pradesh CM: मध्य प्रदेशात भाजपचा महाराष्ट्र फॉर्म्युला, मोहन यादव MP चे नवीन CM; सोबत असणार 2 उपमुख्यमंत्री

MP New CM: मध्य प्रदेशात भाजपचा महाराष्ट्र फॉर्म्युला, मोहन यादव MP चे नवीन CM; सोबत असणार 2 उपमुख्यमंत्री

Satish Kengar

Madhya Pradesh New CM Mohan Yadav:

मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने मध्य प्रदेशात महाराष्ट्र फॉर्म्युला लागू केला आहे. येथेही महाराष्ट्राप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री निवडण्यात आले आहेत. मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. तर जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला हे उपमुख्यमंत्री असतील. नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष केले जाणार आहे.

ओबीसी मोर्चाचे प्रमुख हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले. लक्ष्मण आणि सचिव आशा लाक्रा यांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. शिवराज सिंह चौहान यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोहन यादव (वय 58) हे उज्जैन दक्षिण मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2020 मध्ये त्यांना शिवराज सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री करण्यात आले. मोहन यादव संघाच्या अगदी जवळचे आहेत. संघातील अनेक पदांवर त्यांनी दीर्घकाळ काम केले असून विद्यार्थी परिषदेतही त्यांनी काम केले आहे. मोहन यादव हे ओबीसी प्रवर्गातून येतात. (Latest Marathi News)

आज दुपारनंतर भोपाळमधील भाजप कार्यालयात गर्दी वाढली होती. भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमले होते. आतमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू असताना बाहेर शिवराज सिंह चौहान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर काही नेत्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जात होत्या. मात्र मोहन यादव यांचे नाव समोर येताच सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान, 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातील सर्व 230 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमत मिळवले. 3 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीनंतर भाजपने 163 जागा जिंकल्या तर, काँग्रेसला 66 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजपला 48.55 टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला 40.40 टक्के मतदान झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT