Ahmednagar News: वेठबिगारी! 21 मजुरांची सुटका, शेतमालक गजाआड; अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Newasa News: वेठबिगारी! 21 मजुरांची सुटका, शेतमालक गजाआड; अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Newasa News
Newasa NewsSaam Tv
Published On

>> सचिन बनसोडे

Ahmednagar News:

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या ऊस तोडणी मजुरांकडून अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील शेतमालक वेठबिगारी करून घेत असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघडकीस आला होता. यानंतर श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर शेतमालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अडकवून ठेवलेल्या 21 मजुरांची सुटका करण्यात आली आहे.

राज्यात सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून ऊस तोडणीसाठी राज्यभरातून मजूर विविध ठिकाणी जातात. नेवासा तालुक्यातील पाथरवाला या गावात देखील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून ऊस तोडणी मजूर महिनाभरापूर्वी आले होते. पंकज खाटीक या शेतमालकाकडे गेल्या महिन्याभरापासून हे मजूर काम करत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Newasa News
Maharashtra Politics: 'मविआ'च्या जागावाटपावर शरद पवार यांचे मोठे विधान; ठाकरे गटाचा तो दावाही खोडला

मजूर कामावर आल्यानंतर शेतमालकाने प्रत्येकी दोन हजार रुपये उचल देखील त्यांना दिली होती. मात्र महिना उलटून गेल्यावरही कामाचे पैसे मिळत नसल्याने या ऊस तोडणी मजुरांनी उपासमार होऊ लागली. अखेर त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि गावावरून टेम्पो देखील मागवला. मात्र ज्यावेळी मजूर आपल्या गावी जायला निघाले त्यावेळेस शेतमालकाने त्यांचा टेम्पो अडवून त्यांना जाण्यास मज्जाव केला. 7 डिसेंबर रोजी हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्यातील एक मजूर नेवासा पोलीस ठाण्यात पोहोचला. मात्र त्या ठिकाणी फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांनी केलाय.  (Latest Marathi News)

या घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी तात्काळ नेवासा शहरात धाव घेतली आणि या मजुरांकडून हकीकत जाणून घेतली. यानंतर नेवासे पोलीस ठाण्यात शेतमालक पंकज खाटीक यांच्या विरोधात वेठबिगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर या सर्व ऊस तोडणी मजुरांना त्यांचे पैसे देऊन त्यांच्या गावी पाठवण्यात आलं असून अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

Newasa News
Vijay Wadettiwar News: 'अवयव विक्रीला काढले तरी लाज नाही...' विजय वडेट्टीवार संतापले; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला घेरलं

श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे या 21 मजुरांची सुटका झाली असून याप्रकरणी पोलिसांनी शेतमालक पंकज खाटीक याला अटक केली आहे. अद्यापही यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com