Two Modi government ministers may resign amid BJP reshuffle saam tv
देश विदेश

Rajyasbha Election: भाजपमध्ये मोठा फेरबदल होणार; मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री देणार राजीनामा?

Rajyasabha Election: विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा आहे. उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवार जाहीर केलेत. मोदी सरकारमधील दोन मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Bharat Jadhav

  • मोदी सरकारमधील दोन मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा

  • विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये मोठा फेरबदल

  • उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे आठ उमेदवार

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढील काही दिवसात होणार आहेत. त्यापूर्वी भाजपकडून रणनीती आखली जातेय. मात्र त्याआधी भाजपनं आपल्या पक्षात मोठा फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय. युपी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं ८ नवीन चेहऱ्यांना संधी दिली असली तरी मोदी सरकारमधील दोन मंत्री राजीमाना देणार असल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपने आपल्या आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने धर्मपाल सिंग, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडे, प्रियंका सिंग रावत, राम प्रताप सिंग चौहान आणि श्रुती गंगवार यांना उमेदवारी दिलीय.

हरदीप सिंग पुरी हे सध्या भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्री आहेत. तर बी.एल. वर्मा हे राज्यमंत्री आहेत. हे दोघेही संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे (राज्यसभेचे) सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ या वर्षी संपत आहे. हरदीप सिंग पुरी आणि बी.एल. वर्मा या दोघांनाही नोव्हेंबर २००० मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. हरदीप सिंग पुरी हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. यावेळी भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही.

माजी मुत्सद्दी असलेले हरदीप सिंग पुरी जानेवारी २०१८ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. उर्वरित कार्यकाळासाठी ही जागा भरण्याकरिता त्यांची निवड करण्यात आली होती. २६ नोव्हेंबर २०२० रोजी ते उत्तर प्रदेशातून पुन्हा एकदा राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. सुरुवातीला त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि नंतर, जून २०२४ मध्ये जेव्हा मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले, तेव्हा त्यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बीएल वर्माहेही राजीनामा देणार?

दुसरे प्रमुख नाव बी. एल. वर्मा यांचे आहे. ते केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असून, त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जबाबदारी आहे. बी. एल. वर्मा हे लोधी समाजातील असून त्यांचा राजकीय प्रभाव बदायूं भागात आहे. यावेळी भाजपने त्यांच्या जागी धर्मपाल सिंह यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे.

धर्मपाल सिंह हे देखील लोधी समाजाचे असून योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांसह उत्तर प्रदेशातील भाजपच्या सात राज्यसभा खासदारांचाही कार्यकाल संपणार आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये या सात जणांचा कार्यकाळ संपणार आहे. यात अरुण सिंह, गीता शाक्य, नीरज शेखर, बृजलाल, बीएल वर्मा, सीमा द्विवेदी यांच्या नावाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

पेपरफुटी, खासगीकरण, आरक्षण; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरे काय म्हणाले?

Tuesday Horoscope: कोणत्या राशींचा दिवस खास? धनु, मकर, कुंभसह या राशींना मिळणार आनंदाची बातमी

असे गुरुजी प्रत्येक शाळेत हवेत, विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा 'हेअर कटिंग पॅटर्न'

SCROLL FOR NEXT