विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरने पोहोचला देवदूत Saam Tv
देश विदेश

माणसातला देव, विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरने पोहोचला देवदूत

ही व्यक्ती एका पक्ष्याला वाचवताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओमधील व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही असे असतात जे आपल्याला खळखळून हसण्यास भाग पाडतात. तर, काही असे असतात जे पाहून आपल्याला माणुसकी (Humanity) अजुनही आहे याची जाणीव होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये एक व्यक्ती माणुसकीचे दर्शन घडवून आणत आहे. यामध्ये ही व्यक्ती एका पक्ष्याला वाचवताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओमधील व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे - Bird Stuck On Electric Wire Rescued By A Man Who Reach There By Helicopter

पक्ष्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरने देवदूत आला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पक्षी खूप उंचीवर विजेच्या तारेला अडकलेल्या (Bird Stuck On Electric Wire) असल्याचे पाहायला मिळत आहे. ते पक्षी त्यातून मुक्त होण्यासाठी तडफड करत असल्याचंही व्हिडीओत दिसतंय. पण, ते विजेच्या तारेत असं काही अडकलं आहे की त्यातून सुटणं त्याला शक्य होत नाहीये. पक्ष्याची ती तफडफ सुरु असताना एक व्यक्ती चक्क हेलिकॉप्टरवरुन (Helicopter) त्याच्याजवळ पोहोचते. ही व्यक्ती पक्ष्यासाठी देवदूत बनून येते. हेलिकॉप्टरने त्याच्यापर्यंत पोहोचते. मग ती पक्ष्याला तारेतून मुक्त करते आणि त्याचे प्राण वाचवते (Rescue Bird).

या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. प्रत्येकजण या रिअल लाईफ हिरोची खूप प्रशंसा करत आहे.

पाहा हा व्हिडीओ -

मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण मांडणारा हा व्हिडीओ IFs सुशांत नंदा यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दयाळूपणा या जगाला जगण्यासाठी एक उत्तम ठिकाण बनवते.' हा व्हिडीओ आतापर्यंत 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, या व्हिडीओला 3600 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर 386 लोकांनी तो रिट्विट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT