Processed Foods: प्रॉसेस्ड फूड्स म्हणजे नक्की काय?

Shruti Vilas Kadam

प्रॉसेस्ड फूड्स

जे अन्न पदार्थ नैसर्गिक अवस्थेतून बदल करून तयार केले जातात. म्हणजेच ज्यामध्ये शिजवणे, साठवण, पॅकिंग, मीठ-साखर-तेल घालणे किंवा रसायनांचा वापर केला जातो, त्यांना प्रॉसेस्ड फूड्स म्हणतात.

Processed Food

अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रक्रिया

या पदार्थांवर प्रक्रिया करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे अन्न जास्त काळ खराब न होता टिकावे आणि तयार करताना वेळ वाचावा.

Processed Food Side Effect

प्रॉसेस्ड फूड्सचे सामान्य प्रकार

पॅकबंद चिप्स, बिस्किटे, नूडल्स, इंस्टंट सूप, केक, ब्रेड, जॅम, सॉस, सॉफ्ट ड्रिंक्स हे सर्व प्रॉसेस्ड अन्नपदार्थांचे उदाहरण आहेत.

Processed Food Side Effect

चव आणि रंग वाढवण्यासाठी घटक

या पदार्थांमध्ये कृत्रिम रंग, फ्लेवर, प्रेझर्व्हेटिव्ह, जास्त मीठ किंवा साखर वापरली जाते. त्यामुळे चव वाढते पण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Processed Food Side Effect

आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम

जास्त प्रमाणात प्रॉसेस्ड फूड्स खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांचा धोका वाढू शकतो.

Processed Food Side Effect

सर्व प्रॉसेस्ड फूड्स वाईट नसतात

दुधापासून बनवलेले दही, चीज, फ्रोझन भाज्या, डाळी पॅक करून ठेवलेली असली तरी ती मर्यादित प्रक्रिया केलेली (Minimally Processed) असल्याने तुलनेने सुरक्षित असतात.

Processed Food Side Effect

कसे ओळखाल प्रॉसेस्ड फूड्स?

पॅकेटवरील घटकांची यादी (Ingredients list) खूप मोठी असेल, ओळखीचे नसलेले रसायनांचे नाव असेल आणि शेल्फ लाईफ जास्त असेल तर तो पदार्थ प्रॉसेस्ड फूड असण्याची शक्यता जास्त असते.

Processed Food Side Effect

New Year Couples Resolution: 2026 पार्टनरसोबत न भांडता घालवायचं आहे? नवीन वर्षी जोडीदारासोबत करा हे प्रॉमिस

couples | ai
येथे क्लिक करा