कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे. त्याचा प्रभाव कमी झाला असला तरी बर्ड फ्लू सारख्या व्हायरसने पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. विशेषत: पक्ष्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षण माणसांमध्येही दिसू लागली आहेत. भारतात याचे दोन रुग्ण आढळले असून त्यात एका ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. शास्त्रज्ञांनी हा एक मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे.
बर्ड फ्लू म्हणजेच H5N1 विषाणू काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत प्राण्यांमध्ये पसरत असल्याचं प्रथमत: दिसून आलं होतं. त्यांनंतर हजारो गायींमध्ये या विषाणूची पुष्टी झाली. डेन्मार्क आणि कॅनडामधील प्राण्यांमध्येही हा विषाणू आढळून आला असून प्राण्यांच्या 26 प्रजातींमध्ये याचा संसर्ग झाल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बर्ड फ्लू माणसाचा मृत्यू होणारी ही पहिलीचं घटना होती. या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बर्ड फ्लूबाबत जगभरात अलर्ट जारी केला होता. जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी करून काही दिवसचं उलटले नाहीत तोच भारतात या व्हायरसने पाय पसरायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये एका ४ वर्षाच्या मुलामध्ये H5N1 विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे भारतासाख्या दाट लोकवस्तीच्या देशात बर्ड फ्लूचा मानवाला होणारा संसर्ग हा चिंतेचा विषय बनला आहे.
बर्ड फ्लू H5N1 विषाणू माणसांमध्ये सहज पसरत नाही. जगभराचा विचार केला तर या विषाणूच्या संसर्गाची काही मोजकीच प्रकरणे भारतात आढळून आली आहेत. एक प्रकरण 2019 मधील आहे आणि आता एका रुग्णाला लागण झाली आहे. प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे वाढत आहेत आणि आता मानवालाही याचा धोका निर्माण झाला आहे.
पक्षी आणि प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग रोखणं सोपं नाही. परंतु मानवांमध्ये त्याचा संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो,असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यासाठी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी संक्रमित पक्ष्यांपासून अंतर ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही पक्षी किंवा प्राण्याला लागण झाल्यास अधिकाऱ्यांना याची माहिती द्या. जर ताप, श्वास घेण्यास त्रास आणि डोकेदुखीची लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.