Bird Flu Meta AI
देश विदेश

Bird Flu: पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; १८ मांजरींचा मृत्यू, प्रशासन अलर्ट

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे १८ पाळीव मांजऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना देशात पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लूची पहिली नोंद आहे.

Dhanshri Shintre

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पाळीव मांजरींचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनामध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी करत मांस, चिकन आणि अंडी खरेदी-विक्रीवर ३० दिवसांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, बर्ड फ्लूच्या प्रभावी क्षेत्रांमधील सर्व मटण आणि चिकन दुकाने सील करण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे रोगाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आणि नागरिकांना सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत.

जिल्ह्यात अलीकडेच १८ पाळीव मांजरांचा मृत्यू झाला होता. १५ जानेवारी रोजी ४ आणि २२ जानेवारी रोजी ३ मांजरींचे नमुने घेतले गेले. या नमुन्यांची तपासणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत करण्यात आली. ३१ जानेवारीला प्राप्त अहवालानुसार या पाळीव मांजरींपैकी दोन मांजऱ्यांचे नमुने H5N1 विषाणू पॉझिटिव्ह आढळले. यामुळे बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे आणि प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

देशात पहिल्यांदाच पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. छिंदवाडा शहरातील पशु विभागाने घेतलेल्या दोन मांजरींच्या नमुन्यांमध्ये H5N1 विषाणू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, CMHO ने तात्काळ एक विशेष टीम तयार केली. बर्ड फ्लूच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

पथकाने संक्रमित क्षेत्रातील मांजरींच्या संपर्कात आलेल्या ६५ व्यक्तींचे नमुने गोळा करून ते पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत H5N1 चाचणीसाठी पाठवले. सर्व ६५ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, सध्या छिंदवाड्यात H5N1 चा धोका टळला आहे. तथापि, आरोग्य विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे. प्रशासन या प्रकरणावर देखरेख ठेवून योग्य उपाययोजना करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT