Bilaspur Train Crash: Passenger coach climbs over freight wagon after deadly collision; rescue teams on-site Saam TV Marathi News
देश विदेश

Train Accident : अंगावर काटा आणणारा रेल्वे अपघात! पेसेंजर ट्रेन थेट मालगाडीवर चढली, लोको पायलटसह ११ प्रवाशांचा मृत्यू

Bilaspur passenger train crashes into freight train near station : छत्तीसगडमधील बिलासपूर येथे पेसेंजर ट्रेनने सिग्नल तोडून मालगाडीला जोराची धडक दिली. भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू व अनेक जखमी. १२ तास चाललेले रेस्क्यू ऑपरेशन, सरकारकडून मदतीची घोषणा.

Namdeo Kumbhar

Bilaspur Train Accident death Toll : छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृताची संख्या ११ वर पोहचली आहे. या अपघातात २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. बिलासपूर स्टेशनजवळ पेसेंजर ट्रेन आणि मालगाडीमध्ये भयानक अपघात झाला. पेसेंजर ट्रेनने लाल सिग्नल तोडून मागून येणाऱ्या मालगाडीला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. रेल्वेकडून या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालायत उपचार सुरू आहेत. अपघातामधील मृतांना आणि जखमींना सरकारकडून मदतीची घोषणा कऱण्यात आली आहे. रेल्वेच्या पथकाकडून सिग्नलिंग सिस्टीम आणि चालकाच्या चुकांची चौकशी सुरू आहे. (Chhattisgarh railway accident signal failure cause )

भरधाव पेसेंजर ट्रेन बिलासपूर स्टेशनजवळ मालगाडीवर धडकल्याने भयानक अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की क्षणात होत्याचे नव्हते झाले. रेल्वेमध्ये किंकाळण्याचे आवज आले, जोरात झटका बसला, काही कळण्याच्या आत अनेकजण मृत्यूच्या दारात उभे होते. पेसेंजर ट्रेनमध्ये बसलेल्या एकाही प्रवाशाने विचार केला नसेल इतका भयानक अपघात झाला. अपघाताचे फोटो, दृश्य पाहून अंगावर काटा येईल.

अपघाताची माहिती मिळताच बचावपथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.तब्बल ११ तासानंतर रेस्कू ऑपरेशन यशस्वी झालेय. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतामध्ये लोको पायलटचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, धडकेची धडक इतकी भीषण होती की प्रवासी ट्रेनचा एक डबा मालगाडीच्या वॅगनवर आदळला.

बिलासपूरमध्ये तब्बल ११ ते १२ तास रेस्कू ऑपरेशन चालले. त्यानंतर आता स्वच्छता आणि पुनर्संचयित करण्याचे काम सुरू आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी बिलासपूर रेल्वे अपघातावर दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची भरपाई जाहीर केली. दरम्यान, दुर्घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे उच्च अधिकारी आणि तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वेने संपूर्ण सिग्नलिंग सिस्टीमची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

Maharashtra Live News Update: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

Janjira Fort : आनंदाची बातमी! जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, 'या' कारणामुळे होता बंद

SCROLL FOR NEXT