देश विदेश

Insurance Claim: अपघातावेळी हेल्मेट घातला नाही तर इन्श्युरन्स क्लेम कमी करता येत नाही: हायकोर्ट

Karnataka High Court : हेल्मेट घातलं नाही म्हणून विमा कंपन्या क्लेम कमी करू शकत नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलाय.

Bharat Jadhav

कर्नाटक उच्च न्यायालयाने अपघात विम्यासंदर्भात मोठा निर्णय दिलाय. एखाद्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला आणि अपघातात दुचाकीस्वाराची चूक नसेल तर विमा कंपनीला पूर्ण पैसे द्यावे लागतील. विमा कंपन्या जखमी दुचाकीस्वाराला हेल्मेट न घातल्याबद्दल देय दाव्याची रक्कम कमी करू शकत नाही, असा निकाल दिलाय.

जर एखाद्याने बाईक चालवतांना हेल्मेट घातलं नाही आणि अपघात झाला. तर विमा कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणारे क्लेम कमी केलं जात होतं. याबाबत कर्नाटक हायकोर्टाने मोटा निर्णय निर्णय दिला. जर अपघातात दुचाकीस्वाराची चूक नसेल, तर विमा कंपनी जखमी दुचाकीस्वाराला हेल्मेट न घातल्याबद्दल मिळालेल्या दाव्याची रक्कम कमी करू शकत नाही.

बाईक अपघातावरील कमी दाव्याच्या रकमेच्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालय म्हणाले, “सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे महत्त्वाचे आहे, परंतु नुकसानभरपाई (रक्कम) कमी करण्याचा हा एकमेव निकष असू नये. "मोटार वाहन अपघातांमध्ये योगदानात्मक निष्काळजीपणाची संकल्पना तेव्हाच केली जाते, जेव्हा जखमी पक्षाची स्वतःची निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत ठरते."

काय आहे प्रकरण

रामनगर जिल्ह्यातील सदाथ अली खान यांची दुचाकी ५ मार्च २०१६ रोजी भरधाव वेगाने येणाऱ्या कारला धडकली होती. ज्यामध्ये त्यांच्या मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले होते. तर खान यांनाही अनेक दुखापत झाली होती. या उपचारासाठी १० लाख रुपये खर्च झाल्यानंतर खान यांनी मोटार अपघात विम्याचे क्लेम करण्याची मागणी न्यायाधिकरणाकडे केली होती. ट्रिब्युनलने २४ सप्टेंबर २०२० रोजीच्या आपल्या आदेशात अपघाताच्या वेळी पक्षकाराने हेल्मेट घातले नव्हते हे लक्षात घेऊन त्याला ५.६ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली.

खान यांनी या आदेशाला आव्हान दिले. उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की अपघातानंतर तो ३५००० रुपये प्रति महिना नोकरी चालू ठेवू शकसला नाही. पक्षकार खान ज्या कारच्या धडकेत जखमी झाले होते त्या कारला कोर्टाने विमा कंपनीद्वारे देय असलेली ६,८०, २०० रुपयांची वाढीव भरपाई दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT