Allahabad High Court : धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य नव्हे; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी

Allahabad High Court on religion : धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य नाही, असं मत व्यक्त करत हायकोर्टाने महत्वाची टिप्पणी केली आहे. एका आरोपीने दाखल केलेल्या याचिकेदरम्यान कोर्टाने मत व्यक्त केलं.
धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य नव्हे; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी
Allahabad High CourtSaam TV
Published On

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हायकोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यावर मोठं भाष्य केलं आहे.  हायकोर्टाने धार्मिक स्वातंत्र्य आणि धर्मांतरावर मत व्यक्त केलं आहे. एका व्यक्तीचा याचिका अर्ज फेटाळताना कोर्टाने धर्मांतरावर भाष्य केलं. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर विरोधी कायद्याचा मूळ उद्देश हा सर्व व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याची खात्री देतो. या कायद्याचा उद्देश भारतात धर्मनिरपेक्षतेची भावना जपण्यासाठी आहे, असं मत कोर्टाने व्यक्त केलं.

धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य नव्हे; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी
Independence Day 2024: दिल्ली आणि पंजाब हायअलर्टवर; स्वातंत्र्यदिनाच्या आदल्यादिवशीच पोलिसांची मोठी कारवाई, २ दहशतवादी ताब्यात

अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या पीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना म्हटलं की, 'संविधानाने प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वीकरणे, पालन करणे आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. धर्माच्या स्वातंत्र्याचा अधिकाराला धर्मांतराच्या सामूहिक अधिकाराच्या रुपात प्रोत्साहन दिलं जाऊ शकत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा धर्मांतरित व्यक्ती आणि धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला समान लाभ मिळतो'.

धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य नव्हे; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी
Mumbai High Court : स्पर्म किंवा अंडाशय डोनर मुलांवर कायदेशीर हक्क सांगू शकत नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा

न्यायमूर्ती अग्रवाल यांच्या घटनापीठाने म्हटलं की, 'संविधानानुसार, राज्याचा कोणताही धर्म नसतो. राज्यासाठी सर्व धर्म समान असतात. कोणत्याही धर्माला इतर धर्मापेक्षा प्राधान्य देता येणार नाही. व्यक्तीला आवडीच्या धर्माचा प्रचार, अभ्यास आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. याचिकाकर्ता अजीम हा आयपीसी कलम ३२३,५०४,५०६ आणि उत्तर प्रदेशचा धर्मांतर विरोधी कायद्याचा दोषी आहे.

धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य नव्हे; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी
Supreme Court: दाढी ठेवल्याने महाराष्ट्रातील कॉन्स्टेबलची गेली नोकरी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले, SC काय निर्णय देणार?

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीने पीडितेचा व्हिडिओ तयार करून धमक दिली. हायकोर्टाने या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. याचिकाकर्ता अजीमवर एका तरुणीचं बळजबरीने धर्मांतर केल्याचा आरोप आहे.  या प्रकरणी त्याच्याविरोधात विविध कलमानव्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने हायकोर्टात फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com