Mumbai High Court : स्पर्म किंवा अंडाशय डोनर मुलांवर कायदेशीर हक्क सांगू शकत नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा

Mumbai high Court on sperm or egg donor: एखाद्या व्यक्तीने जर स्पर्म किंवा अंडाशय डोनेट केलं असेल तर तो त्या मुलावर कोणताही कायदेशीर दावा करू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला.
Mumbai High Court On Biological Parent
Mumbai High Court On Biological ParentSaam TV
Published On

एखाद्या व्यक्तीने जर स्पर्म किंवा अंडाशय डोनेट केलं असेल तर तो त्या मुलावर कोणताही कायदेशीर दावा करू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला. आपण मुलाचे बायोलॉजिकल पालक आहोत, असं म्हणण्याचा कुणालाही अधिकार नाही, असंही हायकोर्टाने यावेळी नमूद केलं. मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला लग्नानंतर गर्भधारणा होत नव्हती. त्यामुळे तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला.

Mumbai High Court On Biological Parent
Rajasthan High Court News : मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वतःही नग्न होणं हा बलात्काराचा प्रयत्न नव्हे : हायकोर्ट

तेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला बाळ होणार नाही. तुम्ही सरोगसीसाठी एखाद्या महिलेला विनंती करून मूल जन्माला घालू शकता, असा सल्ला महिलेला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर संबधित महिलेने आपल्या सख्ख्या बहिणीकडे सरोगसीद्वारे बाळासाठी विनंती केली.

बहिणीने अंडकोष देण्यासाठी होकार दिल्यानंतर महिलेच्या पतीने स्पर्म डोनेट केले. त्यानंतर तिच्या बहिणीला जुळ्या मुली झाल्या. काही दिवसांनी अंडकोष देणाऱ्या बहिणीच्या पती आणि मुलीचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे ती या जोडप्यासोबत राहू लागली. तेव्हा जोडप्यामध्ये वाद होऊ लागला.

यानंतर महिलेचा पती दोन मुलींना घेऊन तिच्या बहिणीसोबत वेगळा राहायला लागला. यादरम्यान, महिलेची बहीण आणि तिचा पती मुलींना भेटू देत नव्हता. पतीने दावा केला की मेहुणीने एग डोनेट केल्यामुळे जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यामुळे या दोन्ही मुलींवर फक्त मेहुणीचाच दावा आहे.

यानंतर संबंधित महिला तणावात गेली. तिने बहीण आणि नवऱ्याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल बेंचसमोर सुनावणी झाली. दरम्यान, सरोगेट आई होण्यासाठी दोन्ही बहि‍णींमध्ये करार झाला होता.

एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला केवळ अंडकोष दिल्यामुळे ती त्या मुलांची जेनेटीक आई होऊ शकते. पण बायोलॉजिक पद्धतीने आई असल्याचा दावा करू शकत नाही, असा निर्वाळा न्यायमूर्तींनी दिला. स्पर्म आणि अंडकोष डोनेट करणारी व्यक्ती आपण मुलाचे बायोलॉजिकल पालक असल्याचा दावा करू शकत नाही.

त्यामुळे महिलेची बहीण आणि तिच्या पतीचे वर्तन चुकीचे आहे. महिलेला तिच्या जुळ्या मुलींना तातडीने भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, निर्वाळा देताना हायकोर्टाने दोन्ही बहि‍णींना काही सूचना देखील दिल्या आहेत. दोन्ही मुली 5 वर्षांच्या असून त्यांचे हित तुम्ही बघायला हवं. त्यांच्यासमोर भांडणे करू नका, दोघीही त्यांचा सांभाळ करा असंही न्यायमूर्तींनी सांगितलं.

Mumbai High Court On Biological Parent
Calcutta High Court : सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हटल्यास होऊ शकते तुरुंगवारी; जाणून घ्या हायकोर्टाचा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com