Bihar Heat Weather: बिहारमध्ये उष्णतेचा कहर! उष्माघाताने 24 तासांत 16 जणांचा मृत्यू, तापमान 48 अंशापार
Bihar Weather Saam TV
देश विदेश

Bihar Temprature: बिहारमध्ये उष्णतेचा कहर! 24 तासांत उष्माघाताने 16 जणांचा मृत्यू, तापमान 48 अंशापार

Priya More

बिहारमध्ये उन्हाचा पारा (Bihar Heat Wave) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बिहारमधील उष्णतेच्या लाटेने मागचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. वाढते तापमान आणि उकाड्यामुळे बिहारमधील नागरिक हैराण झाले आहेत. बिहारमध्ये उष्णतेने कहर केला असून नागरिकांना उष्णाघाताचा त्रास होऊ लागला आहे. बुधवारी बिहारमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ३३७ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. तर २४ तासांमध्ये १६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

वाढते तापमान लक्षात घेता बिहार सरकार आणि हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारच्या दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-मध्य भागात एक-दोन ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर राज्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व भागात एक-दोन ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या नैऋत्य-पश्चिम पाटणामध्ये एक-दोन ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज बिहारच्या नालंदामध्ये होमगार्ड जवान आणि बेगुसराय येथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला.

गुरूवारी बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोहतास, भभुआ, औरंगाबाद आणि अरवल येथे कमाल तापमान ४६ अंश ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर दक्षिण मध्य पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा, बेगुसराय, लखीसराय, जहानाबाद येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. २४ तास हवामान कोरडे होते. दक्षिण बिहारमधील बहुतांश भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पाटणा ४२.८ अंश सेल्सिअस, गया ४६.८ अंश सेल्सिअस, भागलपूर ३९ अंश सेल्सिअस आणि पूर्णिया ३७ अंश सेल्सिअस तापमान होते.

बिहारमधील वाढत्या तापमानाचा फटका शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांना बसला. बुधवारी अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना उष्माघाताचा त्रास झाला. बिहिरच्या बेगुसराय आणि शेखपुरा या जिल्ह्यांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना उष्णाघाताचा त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाढते तापमान लक्षात घेता बिहारमधील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ३० मे ते ८ जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज या राशींच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा; नशिबाची मिळणार उत्तम साथ, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya : शनिदेवाच्या कृपेने 'या' राशींचे नशीब हिऱ्यासारखं चमकणार

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT