Tejashwi Will Lead Opposition Bench Saam
देश विदेश

ठरलं तर मग! तेजस्वी यादव विरोधी पक्षनेता, आरजेडीच्या बैठकीत मोठा निर्णय

Tejashwi Will Lead Opposition Bench: आरजेडीची बैठक पार पडली. या बैठकील तेजस्वी यादव यांना पुन्हा विरोधी पक्षेनेते म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Bhagyashree Kamble

  • महागठबंधनच्या पराभवानंतर आरजेडची बैठक

  • बैठकीत नेत्यांची पराभव का झाला? यावर चर्चा

  • तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचा निर्णय

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला घवघवीत यश मिळवत मोठी आघाडी घेतली. भाजपने घौडदौड करत विजयाचे लक्ष्य पार केले. मात्र, दुसरीकडे महागठबंधनला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. अशातच बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव हे पुढील काळातही विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहतील. आगामी राजकीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिल, असे पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केलंय.

आरजेडीने सोमवारी तेजस्वी यादव यांच्या पाटणा येथील निवासस्थानी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत निवडणुकीतील अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. तसेच निवडणुकीतील पराभवावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी पराभवाची कारणे तसेच जनतेपर्यंत पोहोचण्यात झालेल्या त्रुटी मांडल्या.

अनेक नेत्यांनी मान्य केले की, पक्ष मतदारांना, विशेषत: महिला आणि तरूणांना प्रभावीपणे आपला संदेश पोहोचवण्यात अपयशी ठरला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान, तेजस्वी यादव यांनी बैठकीदरम्यान पक्षकार्यकर्ता म्हणून पक्षात सक्रीय राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, उपस्थित आमदार, माजी आमदार आणि नेत्यांनी या गोष्टीला सहमत होण्यास स्पष्ट नकार दिला.

उपस्थितांनी तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त करण्याचा आग्रह केला. लालू प्रसाद यादव यांनी पक्ष सदस्यांच्या विनंतीला सहमती दर्शवली. तसेच अंतिम निर्णय केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brushing Teeth At Night: रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचे फायदे काय ?

Shilpa Shetty Photos: बोल्ड अन् ब्युटिफूल शिल्पा शेट्टीचा नवा लूक, ब्लॅक आऊटफिटमध्ये घातलाय धुमाकूळ

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना महायुती सरकारचा मोठा दिलासा; e-KYC साठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

Actress Search on Google: गुगलवर सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रींना सर्च केलं जात आणि का? जाणून घ्या खास कारण

SCROLL FOR NEXT