Nitish Kumar Saam Tv
देश विदेश

Bihar Election Result: लाडक्या बहिणींमुळे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार? नेमका गेम कुठे फिरला?

Bihar Vidhan Sabha Election Result 2025: बिहार विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांच्या सरकारने महिलांच्या खात्यात थेट १० हजार रुपये टाकले होते. याचा फायदा एनडीएला होताना दिसत आहे.

Priya More

Sumarry:

  • बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार

  • या निवडणुकीमध्ये एनडीएला मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा फायदा होणार

  • या योजनेअंतर्गत नितीश कुमार यांच्या सरकारने महिलांच्या खात्यात १० हजार रुपये टाकले होते

  • या योजनेचा नितीश कुमार सरकारला फायदा होताना दिसत आहे

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला महिलांसाठी राबवलेल्या योजनेचा फायदा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर आहे. एनडीए १८१ जागांवर आघाडीवर आहे. हा कल लक्षात घेता एनडीएला लाडक्या बहिणींसाठी राबवलेल्या योजनेचा चांगला फायदा होताना दिसत आहे. या योजनाचे लाभ घेणाऱ्या महिलांनी भरभरून मतदान केल्याचे पाहायला मिळत आहे. एनडीएने बिहार विधानसभा निवडणुकीपू्वी महाराष्ट्रामध्ये जशी लाडकी बहीण योजना सुरू आहे तशाच पद्धतीची योजना सुरू केली होती. मुख्यमंत्री महिला रोजगार या याजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी १० हजार रुपये जमा केले होते.

सध्या ट्रेंड असा आहे की, भाजपने ज्या राज्यात निवडणुकीपूर्वी महिलांसाठी योजना सुरू केल्या आहेत. त्या राज्यात भाजपला सरकार बनवण्यात यश आले आहेत. भाजपने सर्वात आधी हरियाणा निवडणुकीपूर्वी 'लाडो लक्ष्मी योजना' सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा २१०० रुपये दिले जात होते. हरियाणाच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता मिळवण्यात यश आले. त्यानंतर भाजपने ज्या- ज्या राज्यामध्ये अशाच प्रकारची योजना महिलांसाठी सुरू केली त्याठिकाणी त्यांना मोठं यश मिळाले.

गेल्या काही निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून आले. लाडकी बहीण योजना निवडणुकीमध्ये विजयाची हमी देते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र किंवा झारखंड असो या राज्यांमध्ये महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्याचे फायदे सत्ताधारी पक्षांसाठी सरकार स्थापनेसाठी वरदान ठरले. दरम्यान, पंजाब, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि दिल्लीमध्ये रोख पैसे देण्याचे आश्वासन विजयासाठी महत्वाचे ठरले. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएने 'मुख्यमंत्री महिला रोजगार' योजना सुरू केली. त्याचा फायदा एनडीएला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजनांना राजकीय लोकप्रियता मिळाली. सध्या एनडीए आणि महाआघाडीने महिलांचा विश्वास जिंकण्यासाठी वेगवेगळी आश्वासन देत आणि योजना आणत फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील निवडणुकांच्या अनुभवांवरून लाडक्या बहिणीचा बिहार निवडणुकीमध्ये फायदा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नितीश कुमार यांच्या सरकारने महिलांच्या खात्यात थेट १० हजार रुपये टाकले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. महिलांची मत चोरण्याचा हा नितीश कुमार यांचा प्रयत्न असल्याचा आरोप करत विरोधकांनी याचा निषेध केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे – अंबादास दानवेंचा सल्ला|VIDEO

Bihar Election Result Live Updates : भाजपच्या मैथिली ठाकूर ९ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Live News Update: पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कामाने प्रभावित झालो-हेमंत वाजे

Actress Passes Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

Best Oil For Heart: हिवाळ्यात हृदयरोगाचा धोका वाढतो? नसा ब्लॉक होण्याची भीती? आहारात कोणते तेल वापरावे? FSSAIने दिली माहिती

SCROLL FOR NEXT