Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking News : हातात मेहंदी, कोर्ट मॅरेजची तयारी... अचानक लग्नाला नकार दिला, डॉक्टर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला

bihar woman chops off man's private parts : अचानक लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने बिहारच्या सारण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही

बिहार : बिहारच्या सारण जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मढौरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गर्लफ्रेंडच्या धक्कादायक कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गर्लफ्रेंडला अटक केली आहे.

बिहारमधील महिला डॉक्टरने लग्नाला नकार देणाऱ्या बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. या घटनेनंतर बॉयफ्रेंडची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. या तरुणाला छपरा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी पाटणा पीएमसीएच रुग्णालयात जाण्यास सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मढौरा येथील नर्सिंग होम चालवणाऱ्या डॉक्टरचं वेदप्रकाश नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. तरुणाने लग्नाचं आमिष देऊन अत्याचार केल्याचा डॉक्टर तरुणीचा आरोप आहे.

डॉक्टर तरुणीने सांगितले की, 'तरुणाने कोर्ट पद्धतीने लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. लग्नासाठी मी हाताला मेहंदी लावली होती. मात्र, त्याने लग्नाला नकार दिला. यानंतर रागाच्या भरात बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापून टॉयलेटमध्ये फ्लश केला. मी केलेल्या कृत्याचा मला अजिबात पश्चाताप नाही'.

काय आहे प्रकरण?

सारण पोलीस अधीक्षक डॉ. कुमार आशीष यांनी सांगितलं की, तरुणी खासगी होम नर्सिंग क्लिनिक चालवते. या तरुणीचं एका तरुणासोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या तरुणीची ७-८ वेळा लग्नाची तारीख ठरली होती. मात्र, तिचं लग्न झालं नाही. यानंतर रागाच्या भरात या तरुणीने बॉयफ्रेंडचं गुप्तांग कापलं. या घटनेने सारण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. तसेच पोलिसांकडून या तरुणीकडून चालवण्यात येणारे नर्सिंग होम हा नोंदणीकृत आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT