होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. पटोले यांच्या ऑफरने राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली. आता अशीच ऑफर बिहारमधील भाजपचे मित्र नितीश कुमार यांना मिळालीय. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा उडी मारणार असल्याची चर्चा आहे.
नितीश कुमार एनडीएची साथ सोडत पुन्हा महाआघाडीत जाणार असल्याची चर्चा होण्याचे कारण आहे, लालू प्रसाद यादव यांचं विधान. होळीच्या निमित्ताने लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना ऑफर दिलीय. या ऑफरमुळे आणि राज्यातील वाढत्या हिंदुत्वाच्या वातावरणामुळे नितीश कुमार पुन्हा पलटी मारतील,अशी चर्चा आहे.
प्रत्येक जुनी गोष्ट विसरून सोबत नवी सुरुवात करू. प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने समाजाला पुढे नेऊ, असं विधान लालू प्रसाद यादव यांनी केलं होतं. त्यांनी केलेलं विधान हे नितीश कुमार यांच्यासाठी होतं, अशी चर्चा आहे. दरम्यान याआधीही लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एका सामाजिक न्यायासाठी कधीकाळी एकत्र आले होते.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत बिहारच्या राजकारणात मोठी उलटफेर होणार असल्याची शक्यता आहे. राजकीय जाणकारांच्या मते, लालू प्रसाद यादव यांचे विधान हे एकप्रकारे नितीश कुमार यांना ऑफर देणारं आहे. त्यामुळे ते महाआघाडीत परत जातील अशी शक्यता जाणकरांनी वर्तवलीय. बिहारमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
तर नितीश कुमार हे पुरोगामीचं राजकारण करतात. काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमारांसाठी दरवाजे बंद नाहीत. त्यांच्यासाठी राजदचे दरवाजे कायम खुले असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या ऑफरमुळे नितीश कुमार परत एकदा पलटी मारतील असं म्हटलं जात आहे.
नितीश कुमार कधीही पलटतील. येथे त्यांची काही गॅरंटी नाही असं विधान विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या अधिवेशनात केलं होतं. त्याआधी लालू प्रसाद यादव यांनी २ जानेवारीला नितीश कुमारांसाठी दरवाजे खुले असल्याचं म्हटलं होतं.पाटलीपुत्रचे खासदार मीसा भारती यांनीही असेच काहीसे विधान सुचक संकेत दिलेत. राजकारणात सर्व काही शक्य असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. नितीश कुमार भाजपाच्या दबावात आहेत. राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. राजकीय परिस्थितीचा खेळ असतो. त्यामुळे बिहारमध्ये पु्न्हा भूकंप होऊ शकतो, राजदचे नेते वीरेंद्र म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.