देश विदेश

Bihar Politics: बिहार राज्य सरकारचा विस्तार; नितीश कुमारच्या सरकारमध्ये सामील होतील ९ नवे मंत्री

Bihar State Government : लोकसभा निवडणुकीच्या आधी बिहार राज्य सरकारचा विस्तार आज होत आहे. संध्याकाळी मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल. मंत्र्यांच्या शपथविधी थोड्याचवेळात होणार आहे.

Bharat Jadhav

Bihar State Government Expansion :

राजदसोबतची आघाडी तुटल्यानंतर नितीश कुमार हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. आज नितीश कुमार यांच्या राज्य सरकारचा विस्तार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार आज मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. विस्तारानंतर सायंकाळी साडेसहा वाजता मंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे ३, जेडीयूचे ४ , हिंदुस्तानी आवाम मोर्चामधील १ आणि १ अपक्ष आमदाराचा समावेश आहे. (Latest News)

बिहारमधील भाजप कोट्यातून मंगल पांडे (एमएलसी, ब्राह्मण), अरुणा देवी (एमएलसी, भूमिहार), नीरज बबलू (एमएलसी, राजपूत), नितीश मिश्रा, (एमएलसी, ब्राह्मण), नितीन नवीन (एमएलसी, कायस्थ), जनक राम (एमएलसी, कायस्थ) एमएलसी, दलित), केदार गुप्ता (आमदार, वैश्य), दिलीप जैस्वाल, (एमएलसी, वैश्य), कृष्णंदन पासवान (एमएलसी, दलित), संतोष सिंग (एमएलसी, राजपूत), हरी साहनी (एमएलसी, अत्यंत मागास) आणि सुरेंद्र मेहता ( MLC) बछवारा, कुशवाह) हे मंत्रीपदाची शपथ घेतील.

तर जेडीयूच्या कोट्यातून सुनील कुमार, शीला मंडल, अशोक चौधरी, महेश्वर हजारी, जयंत राज, जामा खान, लेसी सिंग, रत्नेश सदा आणि मदन साहनी हे मंत्रीपदाची शपथ घेतील. बिहारमध्ये सध्या नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ९ आहे. बिहार मंत्रिमंडळात ३५ मंत्री असतात. त्यामुळे किमान २६ आमदारांना मंत्रीपद द्यावे लागणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कालच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सांगितले होतं. पण भापजच्या कोणत्या नेत्यांना मंत्रीपद देण्यात यावे, याची यादी मिळाली नसल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेता आला नाही. दरम्यान ३ फेब्रुवारीला खातेवाटप झाली होती. तेव्हाच मंत्रिमंडळ विस्तार होणार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

SCROLL FOR NEXT