Bihar Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News: लग्नानंतर नवरा नोकरीसाठी शहराबाहेर गेला; बायको पडली दिराच्या प्रेमात, त्यानंतर...

Bihar Crime News: कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला, की पत्नीला पती नकोसा झाला.

साम टिव्ही ब्युरो

Bihar Crime News: लग्नानंतर पती दुसऱ्या शहरात काम करण्यासाठी गेला. त्यामुळे पत्नीला एकटेपणा जाणवू लागला. घरात लहान दीर असल्याने ती दिरासोबत गप्पा गोष्टी मारण्यात वेळ घालवू लागली. दोघांमध्ये छान मैत्रीही जमली. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला, की पत्नीला पती नकोसा झाला.  (Breaking Marathi News)

जेव्हा पती सुट्टी घेऊन पत्नीला भेटण्यासाठी घरी आला तेव्हा पत्नीने दिरासोबत मिळून पतीला मार्गातून दूर करण्याचा प्लान केला. इतकंच नाही तर त्याची हत्या केली. एखांद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा भयानक प्रकार बिहारच्या बेगूसरायमध्ये घडला आहे.

बेगूसरायमध्ये १५ दिवसांपूर्वी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी १५ दिवसात या घटनेचा उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत शिवम कुमार याचा भाऊ शुभम कुमार, पत्नी चांदणी कुमारी यांच्यासह एका आरोपीला अटक केली आहे. पत्नीने दिराच्या मदतीनेच आपल्या पतीची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत शिवम कुमार याचा विवाह चांदणी कुमार हिच्यासोबत झाला होता. शिवमकुमार हा गुजरात येथे एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. लग्नानंतर तो गुजरातला निघून गेला. त्याचवेळी पत्नी चांदणी आणि दिर शुभमकुमार यांच्यात जवळीक वाढली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. (Latest Marathi News)

मात्र, जेव्हा शिवम कुमार घरी आला, तेव्हा तो पत्नी सोबत गुजरातला नेण्याचं म्हणत होता. यामुळे त्याचा भाऊ शुभम कुमार आणि पत्नी चांदनी कुमारी चिडले. अशात त्याच्या हत्येचा प्लान करण्यात आला. प्लाननुसार शिवम कुमारला शुभम कुमार जत्रेत घेऊन गेला. ठरलेल्या जागेवर पैसे पडल्याचं कारण देत शुभम कुमार पैसे शोधू लागला.

दरम्यान, आधीच त्या ठिकाणी लपून बसलेला गुन्हेगार राज किशोर कुमार बाहेर आला आणि त्याने शिवम कुमारवर गोळी (Crime News) झाडली. ही घटना लुटमारी असल्याचं दाखवण्यात आलं. आरोपी त्यांची बाइकही घेऊन फरार झाला. या घटनेनंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि हत्येचा छडा लावण्यासाठी चौकशी सुरू केली.

एक एक करत माहिती समोर येत गेली आणि नंतर जे समोर आलं त्याचा पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणामुळे शिवम कुमारची हत्या त्याचा भाऊ आणि पत्नीने केल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT