Monkey Attack Meta Ai
देश विदेश

Monkey Attack : टेरेसवर बसून अभ्यास, माकडाने जोरात दिला धक्का, दहावीतल्या विद्यार्थीनीने जीव गमावला

Monkey Attack in Bihar : घराच्या गच्चीवर बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीला माकडांच्या टोळीने त्रास दिला. घाबरुन तिने पळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्याच एका माकडाने तिला धक्का दिला. तोल गेल्याने ती गच्चीवरुन खाली पडली.

Yash Shirke

Monkey Attack News : परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. विद्यार्थी दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यास करताना दिसत आहेत. सरावासाठी म्हणून अनेकजण एकत्र बसून अभ्यास करतात. तर काही एकांतांत अभ्यास करणं पसंत करतात. असचं दहावीमध्ये शिकणारी मुलगी घराच्या गच्चीवर अभ्यासासाठी गेली. तिथे काही माकडांनी मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. माकडांनी धक्का दिल्याने ती खाली पडली आणि त्या मुलीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या सिवान जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रिया कुमार असे मृत मुलीचे नाव आहे. दहावीमध्ये शिकणारी प्रिया अभ्यास करण्यासाठी गच्चीवर अभ्यास करायला गेली होती. गच्चीवर माकडांची टोळी आली. टोळीतली माकडं तिला त्रास देऊ लागली. माकडांना घाबरुन प्रियाने पळण्याचा प्रयत्न केला. तिला पाहताच गावकऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला.

माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी प्रियाने गच्चीच्या पायऱ्यांकडे धाव घेतली. तेव्हा एका माकडाने तिच्यावर उडी मारली. त्या माकडाने प्रियाला ढकलले. धक्का लागल्याने प्रिया गच्चीवरुन खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाली. त्यातही डोक्याला जबर मार लागला. घरच्यांनी तिला सिवानच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात काही दिवसांपासून माकडांचा वावर वाढला आहे. माकडांचे लोकांना त्रास देण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशात या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. माकडांकडून होणारा उपद्रव कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT