Kidney Transplant : डुकराची किडनी माणसाला लावली, नंतर काय घडलं बघा!

Kidney Disease Treatment : भविष्यातील अवयव प्रत्यारोपणाची आशा वाढली आहे. झेनोट्रांसप्लांटेशनच्या क्षेत्रात हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जातेय. किडनीच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
Pig Kidney Transplant
Pig Kidney Transplant सोशल मीडिया
Published On

Pig Kidney Transplant : मानवी शरीरात डुकराच्या जनुकीय बदल केलेल्या किडनीचे अनेकदा प्रत्यारोपण यशस्वीपणे झाले. पण डुकराच्या किडनीसह व्यक्ती महिनाभरही जगला नव्हता. पण अलाबामा येथील एक महिला चक्क दोन महिने डुकराच्या किडनीसह जगत आहे. डुकराच्या किडनी लावल्यानंतर सर्वात काळ जगणारी व्यक्ती ठरली आहे. अलाबामाच्या टोवाना लूनी असे त्या महिलेचं नाव आहे. ती आता सूपरवूमन म्हणून चर्चेत आहे. टोवानाच्या यशस्वी पुनर्प्राप्ती हा विज्ञान क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरलाय. त्यामुळे भविष्यातील अवयव प्रत्यारोपणाची आशा अधिक वाढली आहे. झेनोट्रांसप्लांटेशनच्या क्षेत्रात हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जातेय. यामुळे किडनीच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

अलाबामा येथील टोवाना लूनी ही डुक्कराच्या अवयवाचे प्रत्यारोपण केल्यानंतर सर्वात काळ जगणारी व्यक्ती ठरली आहे. अनुवांशिकरित्या डुक्कराची किडनी टोवानाला बसवण्यात आली होती. प्रत्यारोपणाच्या दोन महिन्यानंतरही लूनी जिवंत आहे. असे प्रत्यारोपण केल्यानंतर सर्वाधिक काळ जगणारी व्यक्ती ठरली. हे सर्वात मोठ्या वैद्यकीय यशांपैकी एक मानले जातेय. कारण फक्त स्त्रीसाठीच नाही तर प्रत्येकासाठी डुक्काराची किडनीचे प्रत्यारोपण होऊ शकते. टोवाना लूनी स्वत: ला "सुपरवुमन" म्हणून वर्णन करते. डॉक्टर आणि तज्ञाला तिने आश्चर्यचकित केलेय. लूनीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या भविष्याची आशा वाढली आहे. लुनीच्या केसने जगाला भुरळ घातली आहे आणि जीव वाचवणाऱ्या नवकल्पनांच्या शक्यतांबद्दल सर्व उत्साहाने औषधोपचारात नव्या युगाची सुरूवात झाल्याचे म्हटले जातेय.

लुनी हिच्यावर नोव्हेंबर २०२४ मध्ये डॉ. रॉबर्ट मोंटगोमरी यांनी डुक्काराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले होते. ५३ वर्षीय टोवाना लुनी निरोगी आणि तंदुरुस्त आहे. शनिवारी लुनीच्या किडनी बदलाला ६१ दिवस पूर्ण झाले, आतापर्यंतचा हा सर्वात अधिक काळ झालाय. प्रसारमाध्यमांशी बोलताना लुनी म्हणाली की,"मी एक सुपरवुमन आहे. हा माझ्या जीवनाचा नवा अध्याय आहे." दरम्यान, आतापर्यंत फक्त चार अमेरिकामधील चार जणांना डुक्कराच्या अवयवाचे प्रत्यारोपण झालेय. दोन जणांना किडनी तर दोन जणांना हृदय मिळाले. पण यामधील एकही व्यक्ती दोन महिन्यापर्यंत जगू शकला नाही. लुनीने ६१ दिवसांचा विक्रमी पल्ला पार केलाय. त्यामुळे हे विज्ञान क्षेत्रातील मोठं यश मानले जातेय.

लुनी हिला डुकराची किडनी बसवणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे प्रमुख डॉ. रॉबर्ट मोंटगोमरी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. लुनीला तुम्ही रस्त्यावर चालताना पाहिलं तर वाटणारही नाही, की ती डुकराच्या किडनीवर जिवंत आहे, चालते-फिरतेय. लूनीची सध्याची किडनी एकदम सामान्य किडनी सारखे काम करत आहे. ती सध्या तात्पुरती न्यू यॉर्कमध्ये राहिली आहे. कारण प्रत्यारोपणानंतर तपासणी करण्यासाठी मदत होईल. ती लवकरच गॅडस्टेन, अलाबामा येथे आपल्या घरी जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com