Bihar Marriage Saam Tv
देश विदेश

Bihar Marriage : 6 महिन्यात तरूणीची 3 लग्न, ग्रामस्थांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण वाचून धक्का बसेल

आपल्या देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. यामुळे दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या अजब घटना समोर येत आहेत.

Shivani Tichkule

Bihar News : आपल्या देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. यामुळे दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या अजब घटना समोर येत आहेत. एकापेक्षा एक लग्नांशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुठे नवरी मंडपातून पळून गेली तर कुठे नवरदेवाने वेळेवर लग्नास नकार दिला. मात्र, सध्या बिहारच्या एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

बिहारमधील बेगुसरायमध्ये आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला आलेल्या एका तरुणाला गावकऱ्यांनी पकडलं आणि मंदिरात जबरदस्तीने लग्नगाठ बांधली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघेही या लग्नाला नकार देत राहिले पण गावकऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही आणि त्यांचे लग्न लावून दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

खोदवंदपूर पोलीस (police) स्टेशन हद्दीतील बरियारपूर पूर्व गावातील हे प्रकरण आहे. गेल्या सहा महिन्यात तरूणीचं हे तिसरं लग्न आहे असल्याचे सांगण्यात येत आहे. जे परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पहिले आणि दुसरे लग्न फार काळ टिकले नाही

२० वर्षीय तरुणी ही बेगूसरायच्या मुबारकपूर गावची रहिवासी आहे. तिचं लग्न आधी टांरी गावातील एका तरूणासोबत तिचे पहिले लग्न झाले होते. मात्र काही कारणास्तव हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यामुळे नातेवाईकांना तिचं लग्न गावातीलच एका तरूणासोबत लावून दिलं. यादरम्यान तरुणीचं तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या मित्रसोबत संबंध जुळले. दोघेही लपून भेटू लागले. (Bihar News)

यादरम्यान गावकऱ्यांनी रविवारी रात्री या दोघांना भेटताना पाहून त्यांना बळजबरीने गावातील मंदिरात नेले आणि तिथे दोघांचे जबरदस्ती लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. दोघांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. मात्र अजून ते कुठे आहेत याचा काही पत्ता लागलेला नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT