Sanjay Raut : आमची ही लढाई चोर, डाकू अन् त्यांच्या…; संजय राऊतांचा हल्लाबोल

"हा संघर्ष सुरूच राहणार असून ही सत्याची लढाई आहे"
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

Sanjay Raut Latest News : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. आत्तापर्यंत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड कपील सिब्बल, ॲड अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यानंतर आज शिंदे गटाचे वकील बाजू मांडणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Sanjay Raut
Kalyan News : वडिलांच्या उपचारासाठी मुलानं केलं भलतंच काम; आता आली पश्चातापाची वेळ

काय म्हणाले संजय राऊत?

निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे आज आमच्याकडे नाव नाही. पण तरी आमच्या पाठीशी अनेक लोक आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा सत्ता संघर्ष नाही तर चोरांबरोबरची लढाई आहे. या चोरांना केंद्र सरकार (Central Government) आणि निवडणूक आयोगाने बळ दिलं आहे. या चोर, डाकू आणि केंद्रातील त्यांचे सरदार यांच्या विरुद्ध हा संघर्ष आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. तसेच हा संघर्ष सुरूच राहणार असून ही सत्याची लढाई आहे, असेही ते म्हणाले.

तुमच्या पक्षात सगळे संत-महात्मे आहेत का?

आजही अलोकशाही पद्धतीने हा देश चालतोय. फक्त विरोधी पक्ष आहेत म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. तुमच्या पक्षात फक्त संत-महात्मे बसलेत का की जे दररोज हिमालयातून मंत्रालयात अप-डाऊन करतायत? असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी विचारला आहे.

Sanjay Raut
Nandurbar News: एका ठिणगीने दोन संसारांची राख; दोन्‍ही परिवार उघड्यावर

आशिष शेलारांना प्रत्युत्तर

“तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या मद्यधोरणावरून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, आशिष शेलारांनी हवेत बार उडवण्याची टोळी निर्माण केली आहे. त्यांनी गेल्या ६ महिन्यातलं बोलावं. नगरविकास खात्याबाबत तुम्ही याचिका दाखल केली. त्यात काय म्हटलंय त्यांनी? तो कुणाचा घोटाळा आहे. तुम्ही सांगा तो घोटाळा कोणी केला. आम्ही सांगायला तयार आहोत. खरंतर एनआयटी घोटाळा काय आहे ही माहिती आशिष शेलारांकडे आहे. ते ती मांडीखाली का घेऊन बसले आहेत कळत नाही", असं राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com