बिहारमध्ये खासदाराच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात झाला. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या ताफ्यातील कार अनियंत्रित होत रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये ५ जण जखमी झाले. कटिहारच्या सालमरी येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमाला जात असताना ही घटना घडली. या अपघातानंतर गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कटिहारमध्ये पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या ताफ्याला मोठा अपघात झाला. बेलोरी-सोनैली-सालमारी मुख्य रस्त्यावर त्यांच्या ताफ्यातील वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळले. या अपघातात ५ गंभीर जण जखमी झाले तर खासदार पप्पू यादव थोडक्यात बचावले. रविवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अपघाताची बातमी कळताच घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी केली. या अपघातामध्ये खासदार पप्पू यादव पूर्णपणे सुरक्षित आहेत तर अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या दयनीय अवस्थेवर आणि बांधकाम कामातील निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत स्थानिकांनी देखील संताप व्यक्त केला.
अपघातानंतर पप्पू यादव यांचे कार्यकर्ते चिंतेत आले. पप्पू यादव सुरक्षित आहेतना हे पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर स्वत: पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली आणि आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. या अपघातानंतर रस्त्याचे बांधकाम आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. स्थानिकांनी सांगितले की, या रस्त्यावर यापूर्वीही अपघात झाले आहेत. पण असे असूनही संबंधित विभागांनी आवश्यक पावले उचलली नाहीत. खासदारांच्या समर्थकांनीही याला प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रस्त्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या कंत्राटदार आणि संबंधित इंजिनिअर्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.