Bihar Accident News Saam TV
देश विदेश

Accident News: भरधाव कारची ट्रॅकरला पाठीमागून जोरदार धडक; लग्नाहून परतणाऱ्या ८ जणांचा जागीच मृत्यू

Bihar Accident News: भरधाव वेगात असलेल्या कारने सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Satish Daud

Bihar Car Truck Accident News

भरधाव वेगात असलेल्या कारने सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर काहीजण गंभीर जखमी झाले. ही दुर्देवी घटना बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर सोमवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीपैंकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. अपघातातील (Bihar Accident News) मृतांची नावे अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

या घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील लोक नातेवाईकाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते कारने घरी परतत होते. (Latest Marathi News)

दरम्यान, पसरहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानंद पेट्रोल पंपाजवळ कार आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कारने समोरून जात असलेल्या सिमेंट भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला खोल दरीत जाऊन कोसळली. या भीषण अपघातात कारमधील ८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. मृतांमध्ये ३ लहान मुलांचा समावेश असून पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवणे सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT