Bihar Accident  Saam Tv
देश विदेश

Bihar Road Accident: बिहारमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; २ मृत्यूमुखी तर इतर प्रवासी जखमी

Bihar Accident News: बिहारमध्ये (Bihar)एक भीषण अपघात झाला आहे. कटिहार जिल्ह्यात (Katihar Road Accident) प्रवाशांनी भरलेली एक बस उलटली. कुर्सेला पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bihar Katihar road Bus Accident

बिहारमध्ये (Bihar)एक भीषण अपघात झाला आहे. कटिहार जिल्ह्यात (Katihar Road Accident) प्रवाशांनी भरलेली एक बस उलटली. कुर्सेला पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. एका प्रायव्हेट बसचा हा अपघात झाला आहे. यात दोन प्रवाशांचा मृत्यू तर इतर प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवम डिलक्स ही बस रांचीहून सिलिगुडीला जात होती. कबीर मठाजवळ ही बस उलटली. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिला प्रवाशांचे मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. दोन महिला प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपाचार सुरु आहेत. या अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. याबाबत बसमधील प्रवाशांनी माहिती दिली आहे. बस चालवताना ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे सांगण्यात येत आहे.

बसमधील प्रवासी राहुल कुमारने याबाबत माहिती दिला आहे. कोडरमा येथे रात्रीचे जेवण करण्यासाठी बस थांबली होती. त्यानंतर बस पुढे जाण्यासाठी निघाली. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही बस उलटली आहे. बसमध्ये जवळपास ५०-६० प्रवासी होते, असे त्याने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्सेला पोलिस ठाणे आणि पोथिया पोलि ठाणे तसेच नगरसेवक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...

2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

मुदत संपली,आता HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? खर्च किती होणार? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: 'ज्याने मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक, महापाप केलं तो महापौर', देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT