Railway Police: लोहमार्ग पोलीस वसाहतीचे पुनर्निर्माण करून अल्पदरात घरं द्या पोलीस कुटुंबियांची मागणी

Railway Police Family Protest : सरकारने लोहमार्ग पोलोसांच्या या वसाहतीचे पुनर्निर्माण करून इथेच कायमस्वरुपी घरे द्यावीत अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबाने केली आहे.
Railway Police Family
Railway Police Familysaam tv
Published On

Railway Police Family Protest For House :

बीडीडी चाळीतील पोलिसांना हक्काचे घर अल्पदरात मिळत आहे. तर याच धर्तीवर आता लोहमार्ग पोलिसांच्या कुटुंबाने देखील लोहमार्ग वसाहतीचे पुनर्निर्माण करून इथे अल्पदरात लोहमार्ग पोलिसांना घर देण्याची मागणी केलीय. घाटकोपर येथील वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस पत्नींनी यासाठी एकत्र येत वसाहतीच्या प्रवेश द्वाराजवळ निदर्शने केली. (Latest News)

मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच सर्व सबंधिताना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र दखल घेतली जात नसल्याची खंत कुटुंबियांनी यावेळी बोलून दाखवली. पूर्वद्रुतगती मार्गाला लागून सुमारे ३५ एकरमध्ये लोहमार्ग पोलिसांच्या २४ इमारती उभ्या आहेत. यातील अनेक इमारती धोकादायक म्हणून बंद आहेत. उरलेल्या पैकी ६०० पोलीस कुटुंब इथे राहतात. लोहमार्ग पोलिसांची संख्या साडे तीन हजारांच्या आसपास आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर या विभागाचा पुनर्विकास केल्यास इथे हजारो घरे निर्माण करता येतील. त्यात कायमस्वरूपी घरे लोहमार्ग पोलिसांना मिळतील. दोन तीन पिढ्या इथे राहिल्यानंतर पोलीस कुटूंबांना घरे सोडावी लागतात आणि मुंबईत घरे घेणे कठीण असल्याने मुंबई सोडावी लागते, मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. म्हणून सरकारने लोहमार्ग पोलोसांच्या या वसाहतीचे पुनर्निर्माण करून इथेच कायमस्वरुपी घरे द्यावीत अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबाने केली आहे.

Railway Police Family
CIDCO News: सिडकोच्या ४ भूखंडांवर अतिक्रमण, पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com