CIDCO News: सिडकोच्या ४ भूखंडांवर अतिक्रमण, पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई

CIDCO Property News : तुर्भे येथील सिडकोच्या मालकीच्या चार भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले होत. त्यावर सिडकोच्या बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भूमाफियांबरोबरच विकासकास चांगलीच जरब बसली आहे.
CIDCO News
CIDCO NewsSaam Digital
Published On

CIDCO News

तुर्भे येथील सिडकोच्या मालकीच्या चार भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले होत. त्यावर सिडकोच्या बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भूमाफियांबरोबरच विकासकास चांगलीच जरब बसली आहे. सिडकोच्या मालकीचे चार भूखंड सिडको प्रशासनाने २०१७ साली तारेचे कुंपण घालून संरक्षित केले होते. तसेच सदर भूखंडांवर बांधकाम करण्यावर एमआरटीपी ऍक्ट नुसार कारवाई केली जाईल असे निर्देश देणारा फलकही येथे लावण्यात आला होता.मात्र हा फलक व कुंपण तोडून विकासकाने सदर भूखंडावर बांधकाम सुरू केले होते.

गेली तीन महिन्यापूर्वी तुर्भेतील काही भूमाफियांनी एका बिल्डरला हाताशी धरून सदरचे चारही भूखंड फिफ्टी-फिफ्टी तत्त्वावर विकसित करण्यास दिले होते. या पोटी भूमाफियांनी विकासका कडून या चार भूखंडाची मोठी रक्कम "ऑन मनी" म्हणून घेतल्याची माहिती समोर आली आहे. सदरची बाब येथील काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच आरटीआय कार्यकर्ते तसेच येथील काही ग्रामस्थांनी सदरची बाब सिडकोच्या निदर्शनास आणून दिली होती व सिडकोला सदर बांधकामावर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा पत्र व्यवहारही केला. मात्र सिडको प्रशासनाने उशिरा का होईना सदर बांधकामावर काल धडक कारवाई केल्याने येथील भूमाफियांबरोबरच विकासकास चांगलीच जरब बसली आहे.

CIDCO News
Sion Bridge Accident : मुंबईच्या सायन ब्रिजवर भीषण अपघात, ४ वाहने एकमेकांना धडकल्या

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना सिडकोकडून रीतसर नोटीसाही बजावण्यात आल्याचे सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान सिडकोचे अनधिकृत बांधकाम प्रतिबंधक विभागाचे मुख्य नियंत्रक संजय जाधव आणि सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रण वेणू नायर यांनी पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई केली. अतिक्रमण हटविल्यानंतर याठिकाणी लगेचच तारेचे कंपाउंड वॉल घालण्यात आले. सिडकोने या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्यास एमआरटीपी ऍक्ट नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा आशयाचा प्रथमदर्शनी बोर्ड लावल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

CIDCO News
NCP Melava: युवांची ताकद ही आपल्या पक्षाची प्रेरणा; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com