बहुजन समाज पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर
यादीत ओम प्रकाश दीवाना या प्रसिद्ध भोजपुरी गायकाचा समावेश
बसपा बिहारमधील सर्व २४३ जागा स्वबळावर लढवणार
बिहार विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीने बैठकांचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने पहिली यादी जारी केली आहे. पहिल्या यादीत तिघांच्या नावांचा समावेश आहे. त्यात प्रसिद्ध गायकाचाही समावेश आहे.
बिहारमध्ये उमेदवारांची यादी जाहीर करण्यात बहुजन समाज पक्षाने आघाडी घेतली आहे. बसपाने जाहीर केलेल्या यादीत भभुआ येथून लल्लू पटेल, मोहनिया येथून ओम प्रकाश दीवाना आणि रामगढ येथून सतीश यादव उर्फ पिंटू यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
बसपाने तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या तिघांचा त्यांच्या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. लल्लू पटेल हे भभुआचे जिल्ला परिषद सदस्य आहेत. ओम प्रकाश दीवाना हे प्रसिद्ध भोजपुरी गायक आहे. ते मोहनिया येथून नशीब आजमावणार आहे.
रामगड येथून सतिश यादव यांना उमेदवारी मिळाली असून ते माजी आमदार अंबिका यादव यांचे पूत्र आहेत. मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत सतिश यादव यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी सतिश यादव हे १३६२ मतांच्या फरकाने भाजपचे उमेदवार अशोक कुमार सिंह यांच्याकडून पराभूत झाले होते.
मायावती यांचा बहुजन समाज पक्ष बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काही दिवस आधीच स्वबळाचा नारा दिला होता. बहुजन समाज पक्ष बिहारमधील एकूण २४३ जागा स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
काही दिवसांपूर्वी बसपाचे संयोजक आकाश आनंद यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये सर्वजन हिताय जागरुकता रॅली काढली होती. आकाश आनंद यांची रॅली तब्बल १० दिवस सुरु होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.