Bihar vidhan sabha election result 2025 live Update 
देश विदेश

RJD नाही, JDU नाही....बिहारमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष, आता मुख्यमंत्री कोण होणार?

Bihar assembly election result live Update : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून एनडीएने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. राजद आणि महागठबंधनला मोठा धक्का बसला आहे. आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?

Namdeo Kumbhar

  • बिहारमध्ये २४३ पैकी २०० पेक्षा जास्त जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत.

  • भाजप ९१ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

  • जदयूचे ८१ तर चिराग पासवान यांच्या एलजेपी(रामविलास) चे २१ उमेदवार आघाडीवर आहेत.

  • महागठबंधनला मोठा धक्का बसला असून राजद फक्त २६ तर काँग्रेस केवळ ४ जागांवर आघाडीवर आहे.

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. २४३ जागांवरील कल समोर आले असून एनडीएने २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर महागठबंधन ४० च्या पारही जाऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे, बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष -

भाजपने बिहारमधील स्थानिक पक्षाला मागे टाकत सत्तेकडे वाटचाल केली आहे. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे तब्बल ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे स्थानिक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला मात्र सपाटून मार खावा लागला आहे. भाजपने बिहारमध्ये १०१ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी तब्बल ९१ जागांवर आघाडी घेतली आहे. म्हणजे, फक्त १० जागांवर भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

एनडीएच्या स्थानिक पक्षाचे काय?

नितिश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड पक्षाचे ८१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर चिराग पासवान यांच्या पक्षाचे २१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर मांझी यांच्या पक्षाचे ५ उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

एनडीच्या जागावाटपात भाजप १०१, जनता दल यूनायटेड १०१ जागा लढवल्या आहेत. चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) २९ जागांवर उमेदवार उतरवले. तर जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चाच्या वाट्याला ६ जागा आल्या होत्या.

महागठबंधनचे काय झाले ?

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये विरोधक मैदानात उतरले होते. पण बिहारच्या जनतेने त्यांना नाकारल्याचे सुरूवातीच्या कलांमध्ये दिसतेय. निवडणूक आयोगाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, महागठबंधनला ४० जागाही मिळत नसल्याचे दिसतेय. तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष फक्त २६ जागांवर गटांगळ्या खात आहे. तर काँग्रेसला दुहेरी संख्याही गाठता आलेली नाही. बिहारमध्ये काँग्रेस फक्त ४ जागांवर आघाडीवर आहे.

ओवीसी यांच्या AIMIM पक्षाचे ५ उमेदवार आघाडीवर आहेत. Rashtriya Lok Morcha चे चार उमेदवार आघाडीवर आहेत. Communist Party of India (Marxist-Leninist) चे चार उमेदवार आघाडीवर आहेत. तर Communist Party of India (Marxist) - CPI(M) आणि Bahujan Samaj Party - BSP यांचा प्रत्येकी एक एक उमेदवार आघाडीवर आहेत.

बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?

मागील निवडणुकीत 'किंगमेकर' असलेले नितीश कुमार पुन्हा बिहारचे 'किंग' होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण, बिहारमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष झाला आहे. भाजप सध्या ९१ जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष ८० जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान हे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. पासवान यांच्या पार्टीचे उमेदवार २० पेक्षा जास्त निवडून येण्याची चिन्हे आहेत. २२ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचा मुख्यमंत्री होणार का? की नितीश कुमार पुन्हा खुर्चीवर बसणार? याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

Wednesday Horoscope : सर्व लाभ पदरात पडतील; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

दारू पिण्यासाठी बायकोची परवानगी न घेतल्यास नवऱ्याला जेल? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

वर्ध्यात DRIचं 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'; जंगलातील ड्रग्सचा कारखाना शोधला, १२८ किलो मेफेड्रोन जप्त

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले

SCROLL FOR NEXT