एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचे संकेत.
प्रशांत किशोर यांच्या १५० जागांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह.
महाआघाडीला मोठा धक्का, अपेक्षित जागा मिळण्याची शक्यता कमी.
बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर निकालांचा अंदाज देणारे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या पोलमध्ये महागठबंधन म्हणजेच महाआघाडीला जबर धक्का बसणार आहे, दुसरकडे १५०जिंकण्याचा दावा करणारे रणनितीकार प्रशांत किशोर यांनाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत टफ फाईट देणाऱ्या तेजस्वी यादव यांना या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सर्वच एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने सत्ता राखत असल्याचा अंदाज वर्तवलाय. बिहारमध्ये भाजप, जेडीयू,आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. यात भाजप आणि जेडीयू सरशी करताना दिसत आहेत. मात्र नितीश कुमार सीएम बनणार की भाजप आपल्याकडे मुख्यमंत्रीपद ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारण गेल्यावेळी भाजपने जास्त जागा असूनही पुन्हा एकदा नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पद बहाल केले होते. दुसरीकडे मतचोरी आणि मतदान याद्या, एसआरए प्रक्रियेवरून टीकेची राळ उठवणाऱ्या राहुल गांधींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपला आव्हान देणाऱ्या प्रशांत किशोर यांनाही निराशेला सामोरे जावे लागणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान प्रशांत किशोर म्हणाले होते की, त्यांच्या पक्षाला बहुमत मिळेल.
कदाचित १० जागा कमी होतील, असा दावा त्यांनी केला होता. तर १५० जागा मिळाल्यातरी हा आमच्यासाठी पराभव असेल असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला होता. पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार, एनडीएला १३३-१५९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाआघाडीला ७५-१०१ जागा, तर जेएसपीला ०-५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. इतरांना २-८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
डीव्ही रिसर्चने देखील जनसुराज्य पक्षाला २-४ आणि ओवेसींच्या पक्षाला ०-२ जागा मिळतील. तर एनडीएला १३७-१५२ जागा, महाआघाडीला ८३-९८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. POLSTRAT नुसार, NDA ला १३३-१४८ जागा, महाआघाडीला ८७ १०२ आणि इतरांना ३-५ जागा मिळू शकतात. यात भाजप ६८-७२ जागा, जदयू ५५-६०, एलजेपी (R) ९-१२, हम HAM १-२ आणि RLM ०-२ जागा जिंकू शकतात असा अंदाज आहे.
पोल्स ऑफ पोल्स नुसार एनडीए १३८-१५५ जागा.
महाआघाडीला ८२-९८,
जनसुराजला ०-२
इतरांना ३-७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.