Bihar 28-Year-Old School Teacher Shivani Kumari Killed Saam
देश विदेश

महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

28-Year-Old School Teacher Shivani Kumari Killed: बिहारच्या अररिया जिल्ह्यात महिला शिक्षकाची गोळी झाडून हत्या. दोन गुंडांनी केली तिची हत्या.

Bhagyashree Kamble

बिहारच्या अररिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २८ वर्षीय महिला शिक्षकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक रहिवाशांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्यांना रूग्णालयात दाखल केलं. मात्र, प्राथमिक उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नरपतगंज पोलीस स्टेशनचे पोलीस आणि फारबिसगंजचे एसडीपीओ मुकेश कुमार साहा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशीला सुरूवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी कुमारी असे मृत महिला शिक्षकाचे नाव आहे. महिला शिक्षका अररिया जिल्ह्यातील नरपतगंज येथील एका सरकारी शाळेत शिकवत होती. तसेच त्याच परिसरात भाड्याच्या घरात राहत होती. शिवानी नियमित फारबिसगंज येथून नरपतगंज खाबदर कन्हैली मध्य विद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. बुधवारीही ती सकाळी ९ च्या दरम्यान स्कूटरवरून शाळेत जात होती.

शिव मंदिराजवळ असलेल्या एका दुकानाजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरून आले. २ गुडांनी तिची स्कूटर थांबवली. तिचे हेल्मेट काढायला लावले. नंतर अचानक तिच्यावर गोळीबार केला. तिच्या कपाळावर गोळी झाडली. गोळी लागताच शिवानी रस्त्यावर पडली. या घटनेनंतर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला.

गोळीबाराचा आवाज ऐकताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. शिवानी कुमारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिला तातडीने उचलून उपविभागीय रूग्णालयात नेले. जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही साहित्य आणि पुरावे गोळा केले.

आरोपींनी महिला शिक्षकाची हत्या का केली? हत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास देखील पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, शिवानी कुमारीच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding: शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली समाधानची राणी, लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर

Maharashtra Live News Update : कल्याण ग्रामीण पट्ट्यातील गावात बिबट्याचे दर्शन

सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध निर्माता काळाच्या पडद्याआड

Uddhav Thackeray : मातोश्रीवर बड्या नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

SCROLL FOR NEXT