Bihar Crime News sand mafias killed sub inspector of bihar police at jamui Saam TV
देश विदेश

Crime News: खळबळजनक! वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडलं; भररस्त्यात घडला थरार, आरोपी फरार

Bihar Crime News: गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना वाळू माफियाने ट्रॅक्टरखाली चिरडलं. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

Bihar Crime News

वाळूला काळं सोनं म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे वाळू माफिया वाळू उपसण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मागच्या काही दिवसांपूर्वी वाळू माफियांनी देशभरात उच्छाद मांडला आहे. त्यांना लगाम लावण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अशातच बिहारमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना (Police) वाळू माफियाने ट्रॅक्टरखाली चिरडलं. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. प्रभात रंजन असं मृत्युमुखी पडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रभात रंजन यांना सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रंजन हे जमुई जिल्ह्यातील गढी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत होते.

सोमवारी सकाळच्या सुमारास ते पोलीस कर्मचारी राजेश कुमार साह यांच्यासोबत गस्तीवर होते. यावेळी प्रभात रंजन यांना अवैध्य वाळू वाहतूक करणारा ट्रँक्टर दिसून आला. त्यांनी ट्रॅक्टर थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाळू माफियांनी ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Yellow Nails: नखांचा रंग पिवळा झालाय? वेळीच व्हा सावध, असू शकतो 'हा' गंभीर आजार

Asaduddin Owaisi: महाराष्ट्राच्या राजकारणात ओवैसींची एण्ट्री एमआयएमचा डोळा कुणाच्या मतांवर?

Sanjay Gaikwad: जमीन विकून आमदाराची 25 लाखांची मदत, संजय गायकवाडांच्या मदतीवर काँग्रेसचा आक्षेप

SCROLL FOR NEXT