Sitamarhi Lover Stabs Girl saam tv
देश विदेश

Sitamarhi Lover Stabs Girl: प्रेम प्रकरणातून आणखी एक भयंकर घटना! प्रेयसीला चाकूने 12 वेळा भोसकलं

Bihar Crime News: दिल्लीनंतर बिहारमध्येही एका 22 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय तरुणीवर चाकूने 12 वार केल्याची घटना घडली आहे.

Chandrakant Jagtap

Lover stabs girl 12 times in Bihar's Sitamarhi: प्रेम प्रकरणातून दिल्लीतील श्रद्धा आणि साक्षी हत्याकांडानंतर आता बिहारच्या सीतामढी येथे देखील एका तरुणाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. येथे एका 22 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय तरुणीवर चाकूने 12 वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयत उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

चंदन कुमार असे आरोपीचे नाव असून त्याने तरुणीसमोर ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव तिने नाकारला. त्यामुळे त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करत 12 वार केले. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील बथनाहा पोलीस स्टेशन हद्दीतील हरिबेला गावात सोमवारी ही घटना घडली.

गेल्या चार वर्षांपासून होते प्रेमसंबंध

बथनाहाचे एसएचओ अशोक कुमार सिंग यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी चंदनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनचे तरुणीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते. (Crime News)

लग्नासाठी मुलीवर टाकत होता दबाव

या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी बथनाहा पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. अखेर पंचायतीच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटले होते. मात्र यानंतरही चंदन लग्नासाठी मुलीवर सतत दबाव टाकत होता. सोमवारी ती स्थानिक बाजारातून घरी परतत असताना चंदन तिला अडवलं आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात होणार मोठा बदल; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा आयोगावर पुन्हा मतचोरीचा बॉम्ब, १०० टक्के पुरावे असल्याचेही सांगितले

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्येसाठी बंदूक कुणी दिली? नाव आलं समोर

Dashavatar Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार 10 कोटींचा टप्पा

Pakistan : खोटा संघ घेऊन पाकिस्तान जपानला पोहोचेला, विमानतळावर झाला भांडाफोड; २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT